Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश The Karnataka HC : मृतदेहावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदा करा

The Karnataka HC : मृतदेहावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदा करा

Subscribe

 

कर्नाटकः मृतदेहावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करायला हवा किंवा अस्तित्त्वात असलेल्या कायद्यात तशी तरतुद करावी, अशी महत्त्वपूर्ण सुचना The Karnataka High Court ने बुधवारी केली.

- Advertisement -

ही सुचना करताना The Karnataka High Court ने एका आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्यातून सुटका केली. या आरोपीने २१ वर्षीय मुलीची हत्या करुन तिच्यावर बलात्कार केला होता. मृतदेहावर बलात्कार करणाऱ्याला 376 of Indian Penal Code अंतर्गत शिक्षा ठोठावता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. पण त्या आरोपीला मुलीच्या हत्येसाठी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने कायम केली.

न्या. बी. विरप्पा व न्या. व्यंकटेश नाईक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मृतदेहाला मानवी शरीर म्हणता येणार नाही, असे Sections 375 and 377 of the Indian Penal Code मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीने मुलीची आधी हत्या केली नंतर तिच्यावर बलात्कार केला, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे Sections 375 and 377 of the Indian Penal Code नुसार हा बलात्कार होऊ शकत नाही. परिणामी Section 376 of the Indian Penal Code नुसार आरोपीला बलात्काराची शिक्षा देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

२५ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती. आरोपीने २१ वर्षीय पीडित मुलीची गळा कापून हत्या केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र न्यायालयाने त्याला बलात्कार आणि खुनाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला आरोपीने कर्नाटका उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आरोपीच्या याचिकेला सरकारी पक्षाने विरोध केला होता. Section 375(a) and (c)IPC यामध्ये १९८३ मध्ये अतिरिक्त तरतुद करण्यात आली आहे. यानुसार मृतदेहावर केलेल्या बलात्काराला Section 376 IPC अंतर्गत शिक्षा सुनावली जाऊ शकते. मात्र कायद्यातील अन्य तरतुदींचा आधार देत न्यायालयाने आरोपीची बलात्काराची शिक्षा रद्द केली.

 

amicus curiae(न्यायालयीन मित्र) चे म्हणणे…

याप्रकरणात न्यायालयाने amicus curiae(न्यायालयीन मित्र) ची नियुक्ती केली. संविधानाच्या अनुच्छेद २१ मध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. यामध्ये सन्मानाने मरण्याची तरतुदही आहे. मृत्यूनंतर सन्मानानेच अंत्यविधी व्हावा, असेही या अनुच्छेद २१ मध्ये नमूद करण्यात आले आहे, असे amicus curiae ने न्यायालयाला सांगितले.

न्यायालयासमोरील प्रश्न

मृतदेहावर केलेल्या बलात्काराला शिक्षा होऊ शकते का, असा मुद्दा न्यायालयासमोर होता. त्यासाठी IPC Section 46 चा आधार न्यायालयाने घेतला. या कलमात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कार हा मानवी शरीरावर होऊ शकतो. मृतदेहावर बलात्कार होऊ शकत नाही. बलात्कार हा महिलेच्या ईच्छेविरोधात होतो. मृतदेह हा बलात्काराला विरोध करु शकत नाही. बलात्कार करताना मृतदेहाला ईजा होऊ शकत नाही. बलात्कारात मानवी शरीराच्या भावनांशी खेळले जाते. मृतदेहाला भावना नसतात. मृतदेहाबद्दल असलेल्या कामुक आकर्षणातून बलात्काराची घटना घडते. हा मानसिकतेचा प्रकार आहे. पण कायद्यात मृतदेहावरील बलात्काराला शिक्षेची तरतुद नाही. त्यामुळे आरोपीला शिक्षा द्यावी की नाही, असा मुद्दा न्यायालयासमोर होता.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मृतदेहाचा आदर करायला हवा

मृतदेहाचा अपमान केल्यास त्यासाठी IPC Section 297 अतंर्गत शिक्षेची तरतुद आहे. मात्र अंत्यविधी करताना मृतदेहाचा अपमान केल्यास ही शिक्षा देण्याची तरतुद आहे. या कायद्यात मृतदेहावर बलात्कारास केल्यास शिक्षा देण्याची तरतुद नाही. मात्र मृतदेहाचा आदर आणि सन्मान व्हायलाच हवा, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. असे असले तरी मृतदेहावर बलात्कार करणाऱ्याला शिक्षा ठोठावण्याची तरतूद भारतात नाही हे दुर्देव आहे, असे निरीक्षण कर्नाटका न्यायालयाने नोंदवले.

या देशात आहे शिक्षेची तरतुद

महिला, पुरुष किंवा प्राण्याच्या मृतदेहावर बलात्कार केल्यास शिक्षा देण्याची तरतुद United Kingdom, Canada, New Zealand and South Africa या देशांमध्ये आहे.

- Advertisment -