घरदेश-विदेशThe kerala Story; तामिळनाडू पाठोपाठ दीदींचाही प्रदर्शनाला विरोध

The kerala Story; तामिळनाडू पाठोपाठ दीदींचाही प्रदर्शनाला विरोध

Subscribe

नवी दिल्लीः The kerala Story चित्रपटाच्या प्रदर्शनावर तामिळनाडू पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटावर संताप व्यक्त केला.

५ मे रोजी The kerala Story चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी आणण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शानावर बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपचे आमदार या चित्रपटाचे मोफत शो आयोजित करत आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यावर टीकाही केली. तर ज्येष्ठ अभिनेत्री शबानामा आझमी यांनी या चित्रपटाचे समर्थन केले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याआधीच वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मात्र चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे बाजारपेठेतून या चित्रपटावर जो विचार लोकं करतील तो करतील. त्यांनाच ठरवू द्या चित्रपटाविषयी, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे आणि ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यांनतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाठिंबा देणारे आणि विरोधक असे दोन गट तयार झाले आहेत.

या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समर्थन केले. हा चित्रपट दहशतवादावर आधारित आहे. कॉंग्रेस दहशतवादावर आधारित चित्रपटाला विरोध करत आहे. मतांच्या गणितासाठी कॉंग्रेस दहशतवादाला पाठिंबा देत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. त्यावरुन MIM प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे मोठे अभिनेते आहेत. मोदी बॉलिवूडमध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, अशी टीका औवेसी यांनी मोदी यांच्यावर केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -