घरदेश-विदेशThe Kerala Story : तामिळनाडू सरकार म्हणतं, चित्रपटातच दम नाही

The Kerala Story : तामिळनाडू सरकार म्हणतं, चित्रपटातच दम नाही

Subscribe

 

नवी दिल्लीः The Kerala Story चित्रपटावर तामिळनाडू सरकारने बंदी घातलेली नाही. या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार नाहीत. कलाकारांच्या अभिनयात दम नाही. चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक येत नाही. त्यामुळे थिएटर मालकांनीच या चित्रपटाचे शो दाखवणे बंद केले आहे, असे प्रतिज्ञापत्र तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

- Advertisement -

आम्ही The Kerala Story चित्रपटावर बंदी आणली अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. हेतूपूरस्सर तामिळनाडू सरकारची बदनामी केली जात आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. हा चित्रपट १९ मल्टिप्लेक्सध्ये ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी तामिळनाडू सरकारने या चित्रपटावर बंदी आणणारे कोणतेच आदेश जारी केले नव्हते. उलट कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामिळनाडू सरकारने सुरक्षेची सर्व काळजी घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिल यासाठी सर्व उपाय योजना करण्यात आल्या होत्या. मात्र ७ मे २०२३ रोजी थिएटर मालकांनीच या चित्रपटाचे शो बंद केले. कारण चित्रपट प्रसिद्ध कलाकार नाहीत. कलाकारांच्या अभिनयातही दम नाही. चित्रपट बघायला येणाऱ्यांची संख्याही कमीच होती. त्यामुळेच चित्रपटगृह मालकांनी या चित्रपटाचे शो बंद केले, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

चित्रपटाचे शो थांबवणे हा थिएटर मालकांचा निर्णय आहे. त्याच्यावर सरकार नियंत्रण करु शकत नाही. हा चित्रपट मुस्लीम विरोधी असल्याचा समज समाजात पसरला होता. चित्रपट प्रदर्शनानंंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चित्रपटगृहांना सुरक्षा देण्यात आली. गुप्तचर यंत्रणांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले होते. एवढे करुनही तामिळनाडू सरकारने The Kerala Story चित्रपटावर बंदी आणली अशी चुकीची माहिती न्यायालयात देण्यात आली, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

The Kerala Story चित्रपटावर तामिळनाडू आणि पश्चिम बंंगालमध्ये बंदी आणण्यात आली आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने तामिळनाडू सरकारला याचे प्रत्त्यूतर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तामिळनाडू सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -