Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पॅन कार्ड-आधार लिंक करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ   

पॅन कार्ड-आधार लिंक करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ   

कोरोनाच्या काळात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गोष्ट लक्षात घेता पॅन कार्ड-आधार लिंक करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च म्हणजेच आज शेवटचा दिवस होता. मात्र, आता पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गोष्ट लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढवली जात असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अखेरची तारीख आता ३० जून

- Advertisement -

आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी अखेरची तारीख आता ३१ मार्चऐवजी ३० जून २०२१ असणार आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार आणि पॅन जोडता येणार आहे. आधी आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्यासाठी ३१ मार्च हा अखेरचा दिवस देण्यात आल्याने नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. एकाच वेळी अनेक युझर्सनी लॉग इन केल्यामुळे आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. परंतु, आयकर विभागाने आता नागरिकांना दिलासा दिला आहे.

अनेकदा मुदतवाढ दिली गेली

याआधी केंद्राकडून आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली गेली होती. गेल्या मंगळवारी (२३ मार्च) लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२१’ संमत करण्यात आले. यामध्ये ‘आयकर कायदा १९६१’ मध्ये नव्या कलम २३४ एच नुसार याविषयीची तरतूद करण्यात आली. यानुसार, पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल, तर व्यक्तीला १००० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

- Advertisement -