घरदेश-विदेशभारतीय क्रिकेटचे नेतृत्व भाजपाच्या ‘वंशवादा’कडे... ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

भारतीय क्रिकेटचे नेतृत्व भाजपाच्या ‘वंशवादा’कडे… ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

Subscribe

मुंबई : क्रिकेटवर राजकारण्यांनी कब्जा केल्यापासून तेथे सट्टेबाजी वाढली असल्याचा ठपका न्या. लोढा कमिशनने ठेवला. क्रिकेट राजकीय नेत्यांपासून मुक्त केल्याशिवाय खेळातील सट्टेबाजी थांबणार नाही, असे न्या. लोढा अहवाल सांगतो. पण आज भारतीय क्रिकेटची सर्व सूत्रे भाजपाकडे आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाच्या खजिन्यात साधारण साडेसहा हजार कोटी जमा आहेत. भाजपाचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करीत आहे. आयपीएलचे कमिशनर कोण? तर ते आहेत भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू. त्यामुळे क्रिकेटमध्ये घुसलेले राजकारण व प्रचारकी थाटमाट कमी होणे कठीण आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील 584 कि.मी. लांबीचे रस्ते धुण्याची कामे प्रगतीपथावर; महापालिकेचा दावा

- Advertisement -

संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव अंतिम सामन्यात 240 धावांवरच आटोपला व तुलनेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी चांगली झाली. ऑस्ट्रेलियन संघाचे क्षेत्ररक्षण जबरदस्त होते व भारतीय संघाच्या धावा रोखण्यात ते यशस्वी ठरले. ट्रेव्हिस हेडने कव्हरवरून मागे धावत जात रोहित शर्माचा अप्रतिम झेल घेतला. या झेलची तुलना कपिल देवने 1983च्या अंतिम लढतीत विव्ह रिचर्डस्च्या घेतलेल्या झेलाशी होत आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण क्रिकेटमय कमी आणि राजकीय जास्त वाटत होते. हा जणू भाजपाचा विजय सोहळा आहे, अशा प्रकारची लगबग तेथे होती. क्रिकेट खेळाडूंना तेथे महत्त्व असते तर, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देव, धोनी या विश्वचषक जिंकणाऱ्या क्रिकेट योद्ध्यांना अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने सन्मानाने बोलावले असते, पण वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्याला आमंत्रण नव्हते, अशी खंत कपिल देव यांनी व्यक्त केल्याचे, या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘वंचित’च्या संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण; प्रकाश आंबेडकर यांची माहिती

सन 1983चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव होते. 2011चा वर्ल्ड कप एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला, पण मोदी स्टेडियमवर या दोन महान खेळाडूंना निमंत्रण नव्हते. अनेक भाजपा नेते, चित्रपट कलावंत हजर होते, पण कपिल देव, धोनी नव्हते. हे असे का? याचा खुलासा भारतीय क्रिकेट मंडळाने केला पाहिजे आणि कपिल, धोनी यांना निमंत्रण का नाही? असे सध्याच्या दिग्गज क्रिकेटवीरांनी क्रिकेट नियामक मंडळास विचारायला हवे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -