गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा यांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक असलेले जॅक मा यांचा हा व्हिडिओ चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. जॅक मा हे ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ग्रामीण शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जॅक मा यांनी उपस्थिती लावली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. जॅक मा फाऊंडेशनद्वारे 2015 पासून हा सोहळा आयोजित केला जातो.
हरवलेले चिनी उद्योजक अखेर प्रकटले
ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग