दिल्लीत पुन्हा हत्याकांड! व्यसनाधीन मुलाने केली घरातील चौघांची हत्या

घटनास्थळावरून काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये बहिणीची हत्या खोलीत दिसत आहे. दर, आजीचा मृतदेह एका बेडवर आहे. तर, एक बहिण आणि वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये आहे.

नवी दिल्ली – श्रद्धा हत्याप्रकरणातून (Shraddha Murder Case) देश सावरत असतानाच दिल्लीतून आणखी एका हत्याकांडाची (Delhi Crime) माहिती समोर आली आहे. दिल्लीतील पालम भागात एका घरात चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलानेच त्याचे वडील, दोन बहिणी आणि आजीची हत्या केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – तीन नाही, तर चार वर्षांनी मिळणार ग्रॅज्युएशन डिग्री; ‘हे’ आहेत UGCचे नवे नियम

दिल्लीतील पालममधील राज नगर भाग-2 भागात मंगळवारी रात्री 10.31 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून, त्याने आपल्याच वडिल, दोन बहिणी आणि आजीला का मारले याचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चारही जणांची चाकूने वार करून हत्या केली आहे. आरोपी मुलगा अंमली पदार्थांच्या व्यसनाने त्रस्त असून नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला होता. त्यानंतरच त्याने हे कृत्य केलं आहे. केशव असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे.

हेही वाचा – आफताबच्या घरातील बाथरूममध्ये CFSI ला सापडले रक्ताचे डाग, कोर्टाकडून पॉलिग्राफ टेस्टला परवानगी

घटनास्थळावरून काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये बहिणीची हत्या खोलीत दिसत आहे. दर, आजीचा मृतदेह एका बेडवर आहे. तर, एक बहिण आणि वडिलांचा मृतदेह बाथरुममध्ये आहे.

हत्या झालेल्यांची नावे

1. दिवानो (आरोपीची आजी)
२. दिनेश कुमार (आरोपीचे वडील)
३. दर्शन राणी (आरोपीची आई)
४. उर्वशी (आरोपीची बहीण)