Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी पदाभार स्वीकारला

हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी पदाभार स्वीकारला

Subscribe

आशुतोष दीक्षित यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांना अनेकवेगळ्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. २००६ मध्ये २६ जानेवारी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वायू सेना पदक'ने सन्मानित केले आहे.

मुंबई | एअर मार्शल आशुतोष दीक्षित (Air Marshal Ashutosh Dixit) यांनी भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) दिली आहे. उपप्रमुख पद म्हणून हवाई दलातील नवीन खरेदी आणि आणीबाणीच्या अधिकारांतर्गत सेवेसाठी करावयाच्या संपादनांवर देखरेख करणार आहेत.

आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी असून त्यांनी दक्षिणी हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे १९८२ मध्ये लढाऊ पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

- Advertisement -

आशुतोष दीक्षित यांनी मिग-२१ आणि मिग-२९ यासह विविध लढाऊ विमाने उडवण्याचा त्यांना अनुभव आहे. गेल्या २३ वर्षापासून आशुतोष दीक्षिप हे भारतीय हवाई दलात सेवा बजावत आहेत. आशुतोष दीक्षित आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात २० हून अधिक प्रकारच्या विमानांवर ३२०० तासा उड्डाणाचे तास नोंदवले आहेत.

प्रशिक्षक म्हणूनही काम केले

- Advertisement -

एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूलमध्ये प्रशिक्षक देखील राहिले आहेत. त्या व्यतिरिक्त नव्याने स्थापन झालेल्या मिराज-२००० स्क्वाड्रनचे आणि फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे सीओ सुद्धा आहेत. आशुतोष दीक्षित यांनी बांग्लादेशमध्ये स्टाफ कोर्स पूर्ण केला आहे.

आशुतोष दीक्षित यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांना अनेकवेगळ्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. २००६ मध्ये २६ जानेवारी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वायू सेना पदक’ने सन्मानित केले आहे.

- Advertisment -