घरताज्या घडामोडीसंसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु, १९ दिवस चालणार कामकाज

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु, १९ दिवस चालणार कामकाज

Subscribe

पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही सत्रांदरम्यान दोन्ही सदनांचा वेळ हा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन या महिन्यापासून सुरु होत आहे. जुलै १९ २०२२ रोजी संसदीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ दिवसांचे असून १३ ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार आहे. नेहमी संसदेचे पावसाळी अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर संपते. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करुन संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्यात येत आहे. तसेच सर्व सदस्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

संसदेच्या अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना आणि मीडियाला कोरोना नियमांनुसार परवानगी देण्यात येत आहे. परंतु त्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी अनिवार्य असणार नाही मात्र ज्यांनी कोरोना लसीचे डोस घेतले नसतील त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले जाईल.

- Advertisement -

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे की, यावेळी पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही सत्रांदरम्यान दोन्ही सदनांचा वेळ हा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. संसदेचे ३११ सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर २३ सदस्यांनी कोरोनाची लागण झाल्यामुळे कोरोना लस घेतली नाही. १८ जुलै रोजी सदनातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये संसदीय अधिवेशनच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे काही समित्यांमध्ये पदे रिक्त असल्यामुळे तिथे नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -