नवी दिल्ली : भारत आता विविध पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठेवल्यानंतर सूर्याकडेही आदित्य एल-1 झेपावले आहे. यादरम्यान अवकाशानंतर भारत आता समुद्रातील रहस्य उलगडण्यास सज्ज झाला असून, त्यासाठी समुद्रयान मोहीमेची चाचपणी केली जात आहे.(The moon and the sun are now ready to reveal the secret of the deep water Samudrayaan mission begins testing)
समुद्रातील तळाशी असलेला खजिना आणि गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारताचं मिशन समुद्रयान सुरू झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) चेन्नईने यासाठी एक विशेष पाणबुडी विकसीत केली आहे. मत्स 6000 यातून तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात 6 हजार मीटर खोलवर उतरणार आहे ज्याचा उद्देश ब्लू इकॉनॉमीसाठी संधी शोधणे हा आहे.
पाणबुडी 2026 पर्यंत वापरासाठी होणार सज्ज
‘समुद्रयान’ या मोहिमेसाठी भारत ‘मत्स्य 6000’ पाणबुडी तयार करत आहे. मार्च 2024 पर्यंत या पाणबुडीचे काम पूर्ण होणार असून, 2026 पर्यंत त्याचा वापर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण मोहिमेचे नाव समुद्रयान आहे, ज्यामध्ये तीन लोकांना समुद्राच्या 6000 मीटर खाली पाठवले जाणार आहे.
हेही वाचा : JDS च्या देवगौडांच्या हाती आता ‘कमळ’; आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय
समुद्रातील रहस्य जाणून घेण्याचा उद्देश
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठेवले असून, ही कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने नुकतेच आदित्य एल-1 नावाचे यान सूर्याच्या दिशेने सोडले आहे. त्यानंतर आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या भारतीय संस्थेकडून समुद्रातील रहस्य उलगडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सहा हजार मीटर खोलवर जाऊन तज्ज्ञांची टीम समुद्रातील रहस्य शोधणार आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार आहे.
हेही वाचा : ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा
जलकृषी विकसीत करण्याचा उद्देश
भारताला 7 हजार 517 किलो मीटर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात नऊ समुद्रकिनारी राज्ये आणि 1382 बेटे आहेत. या मिशनमुळे ब्ल्यू इकोनॉमी मजबूत केली जाणार आहे. मत्सपालन आणि जलकृषी यातून विकसीत होणार आहे. समुद्र असणारे खनिजं शोधून ते उपयोगात आणण्याचा हा उद्देश आहे.