घरट्रेंडिंगशौक बड़ी चीज है! जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव...

शौक बड़ी चीज है! जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण

Subscribe

सर्व फळांमध्ये आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. जगात आंब्याच्या काही जाती किंवा प्रकार आहेत. मात्र असेही आंब्यांचे काही प्रकार आहेत जे सर्वात महागडे आहेत. “तैयो नो तामागो” हा आंबा प्रकार फक्त जपानच्या मियाझाकी प्रांतात आढळतो. या जातीच्या दोन आंब्यांची जोडी तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. हा आंबा सहज बाजाराच उपलब्ध होत नाही तर त्याची विशेष ऑर्डर मिळाल्यावरच लागवड केली जाते, तेव्हाच हा आंबा अगदी सहज मिळतो .हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा अशा रंगांचा असतो. जपानमध्ये हे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यादरम्यान तयार केले जाते, म्हणून त्यास खूप खर्च करावा लागतो कारण ते एका खास पद्धतीने तयार केले जात असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

हा अनोखा आंबा झाडावर येताच जाळीच्या कपड्याने बांधला जातो. या आंब्याचे वजन साधारण ३५० ग्रॅम पर्यंत असते. बाजारात या आंब्याची जोडी विकली जाते. दोन आंबे म्हणजे ७०० ग्रॅम, आणि या दोन आंब्यांची किंमत अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असते, तर एका किलोसाठी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. २०१७ मध्ये या आंब्याच्या जोडीचा लिलाव झाला, ज्यामध्ये तो विक्रमी ३६०० डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख ७२ हजार रुपयांना विकली गेली.

गेल्या काही दिवसांपूर्वी नूरजहाँ आंब्याची चांगलीच चर्चा होती. मध्य प्रदेशातील काठीवाडा भागात मिळणाऱ्या आंब्याला ‘नूरजहाँ’ असे म्हटले जाते. या जातीच्या एका आंब्याची किंमत हजार रुपयांपर्यंत आहे. हा आंबा गुजरातला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागातच पिकवला जातो. काठीवाडा हे इंदूरपासून साधारण अडीचसे किमी. अंतरावर आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नूरजहाँ’ या जातीच्या आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. यावर्षी या पिकाचे उत्पन्न चांगले झाले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, काठीवाड्यातील आंबा उत्पादक शिवराजसिंग जाधव यांनी असे सांगितले की, “माझ्या बागेत तीन नूरजहाँ आंब्याची झाडे आहेत, ज्यामध्ये साधारण २५० आंबे तयार झाले आहेत. बाजारात एका आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपये मिळत आहे. हा आंबा महाग असला तरी यासाठी ग्राहकांकडून बुकिंग आधीच केले जाते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -