‘सा रे भा ग गये’, लडाखच्या खासदारांचा फोटोतून संजय राऊत यांना टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अनेक खोचक वक्तव्यांवरही अनेक टिका होत आहेत. संजय राऊत यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय तांडव दिवसेंदिवस वाढत चालले असून एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून निघालेला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट शक्यता जाणवत आहे. अशातच अनेकजण या एकूण राजकीय घटनांवर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. महाराष्ट्रात एकीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांवर टिका केली जात आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे सर्मथन सुद्धा केले जात आहे.

याव्यतिरिक्त आता सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणा संबंधीत अनेक मीम्स आणि गमतीदार फोटो व्हायरल सुद्धा होत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अनेक खोचक वक्तव्यांवरही अनेक टिका होत आहेत. संजय राऊत यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

खरंतर हा फोटो लडाख येथील भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी त्यांच्या ट्वीटर अकांउटवर शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये संजय राऊत हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तसेच या फोटो खाली जामयांग सेरिंग नामग्याल यांनी “सा रे भा ग गये” असं कॅप्शन सुद्धा दिलेले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. यात एक युजरने लिहिले आहे की, “हे हार्मोनियम वाजवत राहिले आणि शिंदेंनी यांचा बॉंन्ड वाजवला”, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे जेवढ्या धमक्या देतात, तेवढेच यांचे आमदार कमी होतात. यांना विचारायला हवं की बाळासाहेबांची तत्वं काय आहेत? ते कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करार करायचे? ते कधी कॉंग्रेससोबत एकी करायचे?”, तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “मोदीजी यांनी खरंच अर्थव्यस्था बरबाद केली आहे. आता आमदार २-२ रूपयांसाठी ट्वीट करू लागलेत”.