घर ताज्या घडामोडी पाहा : अशोकचक्रापासून ते चाणाक्य, आंबेडकरांपर्यंत नव्या संसद भवनातील अप्रतिम कलाकृती!

पाहा : अशोकचक्रापासून ते चाणाक्य, आंबेडकरांपर्यंत नव्या संसद भवनातील अप्रतिम कलाकृती!

Subscribe

देशाच्या विविध भागातून अनेक कलाकृत बनवून नव्या संसद भवनात लावण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. देशाचे नवे संसदभवनात वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार पाहायला मिळणार आहे.

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. मोदी सरकारने अत्यंत कमी कालावधीत नवीन संसद भवनाचे काम पूर्ण केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे नवे भवन तयार झाले असल्याने त्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. (The new parliament building was prepared with various items and materials from the country)

देशाच्या विविध भागातून अनेक कलाकृत बनवून नव्या संसद भवनात लावण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. देशाचे नवे संसदभवनात वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार पाहायला मिळणार आहे. अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार तसेच कारागिरांनी विक्रमी वेळेमध्ये वास्तूच्या उभारणीचे काम पूर्ण केले आहे.

- Advertisement -

अशोकचक्र –

 • अशोकस्तंभासाठीच्या उभारणीची सामग्री ही महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानातील जयपूर येथून आणण्यात आली होती.
 • लोकसभा आणि राज्यसभेच्या महाकाय भिंतींवर आणि संसदेच्या बाहेर लावण्यात आलेले अशोकचक्र खास इंदूरमधून मागविण्यात आले आहे.
 • दगडांचे कोरीव काम आबू रोड आणि उदयपूर येथील मूर्तिकारांनी केले आहे. हे दगड राजस्थानातील कोटपूतली येथून आणण्यात आले आहेत.
 • खास बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या विटा हरियाणा आणि उत्तरप्रदेशातून मागविण्यात आल्या आहेत.

देशाचे प्रतिबिंब –

 • सभागृहातील जमिनीवर बांबूचे आच्छादन टाकण्यात आले असून त्यावरील वस्त्रप्रावरण हे मिर्झापूरमध्ये तयार करण्यात आलेले आहे.
 • विविध ठिकाणांवर रंगरंगोटीसाठी वापरण्यात आलेले लाल आणि पांढऱ्या रंगाचे खडे राजस्थानातील सरमथुरा येथून आणण्यात आले आहेत.
 • बांधकामाची वाळू चरखी दादरी येथून आणण्यात आली असून सभागृहातील अंतर्गत सजावटीसाठीचे सागवान लाकूड नागपूरहून मागविण्यात आले आहे.
- Advertisement -

सेंगोल –

 • संसद भवनात ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेले ऐतिहासिक सेंगोल ठळकपणे स्थापन केले आहे.
 • नरेंद्र मोदी यांनी याची स्थापना केली. या सेंगोलला खूप महत्त्व आहे.
 • १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तामिळनाडूतून हे सेंगोल मिळाले आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचं प्रतीक म्हणून स्वीकारलं.
 • हे ब्रिटीशांकडून या देशातील लोकांकडे सत्ता हस्तांतराचे प्रतीक आहे.

आतील दृश्य –

 • संसदेतील ६ गेट्स आणि सार्वजनिक रस्त्यांवर देशाच्या विविध भागातून आणलेल्या सजवलेल्या कलेची झलक पाहायला मिळेल.
 • देशात पुजल्या जाणार्‍या प्राण्यांची झलकही येथे पाहायला मिळणार आहे. यामध्ये गरुड, गज, अश्व आणि मगर यांचा समावेश होतो.
 • येथे तीन गॅलरी समाविष्ट केल्या जातील, ज्यात भारताचा ऐतिहासिक ते आधुनिक काळातील प्रवास दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 • ७५ फूट उंचीची दोन पितळी भित्तीचित्रेही असतील असे सांगण्यात येत आहे.
 • यापैकी एकावर भारतीय वारसा आणि संस्कृती कोरली जाणार आहे. दुसरीकडे, समुद्रमंथनाची कथा सांगितली जाईल.
 • नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे माजी प्रमुख अद्वैत गणनायक सांगतात की, संसदेच्या नवीन इमारतीत देशाचा इतिहास आणि २१व्या शतकातील चित्रही दाखवले जाणार आहे.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभाई पटेल यांची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे.

७५ कलाकारांचे प्रयत्न –

 • नवीन संसद कलात्मक दुष्ट्या सजवण्यासाठी सुमारे ७५ कलाकारांची मेहनत आहे.

तीन विशेष दरवाजे –

 • नवीन संसद भवनात तीन नवीन दरवाजे समाविष्ट करण्यात आले आहेत.
 • जे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार म्हणून ओळखले जातील.
 • या इमारतीत महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि चाणक्य यांचे ग्रेनाइटचे पुतळे बसवण्यात येणार आहेत.

मुंबईत तयार झाले फर्निचर

 • संसदभवनाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेला केशरी हिरव्या रंगाचा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा येथून तर पांढऱ्या रंगाचे संगमरवर राजस्थानच्या अंबाजी येथून आणण्यात आले आहे.
 • लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सीलिंगसाठी वापरण्यात आलेले स्टील दमण आणि दीव येथून आणण्यात आले आहे.
 • संसदेतील सगळे फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे.
 • दगडांच्या जाळ्यांची कामे राजस्थानचे राजनगर आणि नोएडा येथे करण्यात आली आहेत.

हेही वाचा – नव्या संसद भवनातील सगळं फर्निचर मुंबईत तयार; वाचा सविस्तर

- Advertisment -