कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा जास्त घातक, टास्क फोर्सने दिली माहिती

सध्या दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसंच, वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण देशभरात काळजी घेणे गरजेचं आहे.

Mumbai Corona Update 536 new corona cases and 3 death registered in 24 hours

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. नियमित हजारो रुग्णांचं निदान होत आहे. त्यामुळे सरकारसमोरील आव्हान पुन्हा एकदा वाढलं आहे. त्यातच, दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर दिल्लीतून एक नवा व्हेरियंट समोर आला आहे. हा नवा व्हेरियंट ओमिक्रोनपेक्षाही घातक असल्याचं सांगण्यात येतंय. (The new variant of Corona is more dangerous than Omicron)

हेही वाचा – कोरोनाची दहशत! ‘या’ राज्यात पुन्हा मास्क सक्ती, अन्यथा 500 रुपयांचा दंड

कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी सांगितलं की, दिल्लीत सापडलेला ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट अधिक संसर्गिक आहे. दिल्लीत पुन्हा कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. सध्या दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसंच, वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण देशभरात काळजी घेणे गरजेचं आहे.

“ओमिक्रॉन व्हेरियंट जास्त घातक नव्हता. त्यामुळे ओमिक्रॉनने बाधित होणाऱ्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. मात्र, सापडलेला नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा २० ते ३० टक्के जास्त संसर्गिक आहे,” असंही डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – राज्यात 1877 नवे कोरोना रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू

कोरोना विषाणू भारतात येऊन आता २ वर्षे झाली आहे. त्यामुळे कोरोना हा इतर रोगांप्रमाणेच इथला स्थानिक आजार होणार का याबाबत डॉ.अरोरा यांना विचारलं असता ते म्हणाले की किमान पुढचे पाच वर्षे तरी कोरोना विषाणू भारतात राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीत मास्कसक्ती

भारतात अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढतेय. मुंबई, दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. दिल्लीत एकाच दिवसात कोरोनाचे 2000 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.