जगातील कोरोनाबाधितांची संख्या ८५ लाख पार; आतापर्यंत साडे चार लाखांहून अधिक जणांचे बळी!

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत चीन २० व्या स्थानावर आहे. तर भारत चौथ्या स्थानावर आहे.

2.15 lakh corona patient found in 24 hours in the world
Corona: जगात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत २.१५ लाख नवीन रुग्ण

जगभरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तरी देखील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. दरम्यान जगात ८५ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत साडे चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा २२ लाखांहून अधिक आहे. तर १ लाख २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत ८५ लाख ७८ हजार ०५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर यापैकी ४ लाख ५६ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४३ लाख २४ हजार ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक २२ लाख ६३ हजार ६५१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून १ लाख २० हजार ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकनंतर सर्वात जास्त मृत्यू ब्राझील, ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये झाले आहे. जगात १७ देशांमध्ये १ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,२६३,६५१ – मृत्यू – १२०,६८८
ब्राझील : कोरोनाबाधित – ९८३,३५९ – मृत्यू – ४७,८६९
रशिया : कोरोनाबाधित – ५६१,०९१ – मृत्यू – ७,६६०
भारत : कोरोनाबाधित – ३८१,०९१ – मृत्यू – १२,६०४
ब्रिटन : कोरोनाबाधित – ३००,४६९ – मृत्यू – ४२,२८८
स्पेन : कोरोनाबाधित – २४५,२६८ – मृत्यू – २७,१३६
पेरू : कोरोनाबाधित – २४४,३८८ – मृत्यू – ७,४६१
इटली : कोरोनाबाधित- २३८,१५९ – मृत्यू – ३४,५१४
चिली : कोरोनाबाधित – २२५,१०३ – मृत्यू – ३,८४१
इराण : कोरोनाबाधित – १९७,६४७ – मृत्यू – ९,२७२


हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सलग १३ व्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ!