Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोना महामारीत TB ने होणाऱ्या मृत्यूत १९२ पटीने वाढ

कोरोना महामारीत TB ने होणाऱ्या मृत्यूत १९२ पटीने वाढ

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना महामारी कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने अद्याप बाधितांची संख्या वाढताना दिसतेय. अशातच कोरोना महामारीदरम्यान आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. टीबीच्या म्हणजेच क्षयरोगाच्या मृत्यूचे प्रमाण या काळात अनेक पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुासर, गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीत टीबीच्या १९२ पट अधिक रुग्णांनी आपला जीव गमावला. एका आरटीआयमध्ये असे आढळून आले आहे की, २०१९ मध्ये दिल्लीत ११ रुग्णांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता परंतु २०२० मध्ये कोरोना महामारीनंतर २ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे टीबी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना महामारीदरम्यान, रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने, कोविड -१९ आणि टीबीच्या लक्षणांमध्ये समानता आणि रूग्णांची ओळख न पटल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. टीबी हा एक संसर्गजन्य रोग असून जो फुफ्फुसांव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांमध्ये देखील होऊ शकतो.टीबीचे विषाणू संक्रमित रुग्णाकडून हवेद्वारे सामान्य व्यक्तीकडे प्रसारित केले जाऊ शकते. हा संसर्ग खूप तीव्र असून दरवर्षी देशात हजारो लोकांचा मृत्यू झाला. २०२५ पर्यंत देशाला टीबीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी मोहीमही सुरू केली आहे, परंतु कोरोना महामारीमुळे टीबी रुग्णांच्या उपचारावर गंभीर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

दिल्लीत राहणाऱ्या सरिता विहार येथील रहिवासी जुनैद अहमद यांनी सांगितल्यानुसार, गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर त्यांना तीन महिने औषध मिळू शकले नाही, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हाले लागले. त्यानंतर त्यांना १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसरीकडे, लक्ष्मी नगरमधील रहिवासी शेफाली लांबा यांनी सांगितले की, तिच्या वडिलांना टीबीचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना जवळच्या क्लिनिकमधून सहा महिने घरी राहून उपचार सुरू होते मात्र १७ सप्टेंबर २०२० रोजी त्याचा मृत्यू झाला.


कोकणातील चाकरमान्यांच्या मार्गात खड्डे, पावसाचे विघ्न

- Advertisement -