घरताज्या घडामोडीचर्चा तर होणारच; रेशनचे धान्य घेण्यासाठी आला मर्सिडिजमधून आणि...

चर्चा तर होणारच; रेशनचे धान्य घेण्यासाठी आला मर्सिडिजमधून आणि…

Subscribe

मर्सिडीज या अलिशान गाडीतून आलेल्या व्यक्तीने शिधावाटप दुकानातून 4 गोणी धान्य घेतल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला. पंजाबच्या होशियारपूरमधील शिधावाटप दुकानात एक व्यक्ती आला आणि त्याने दुकानदाराला शिधापत्रिका दाखवली.

मर्सिडीज या अलिशान गाडीतून आलेल्या व्यक्तीने शिधावाटप दुकानातून 4 गोणी धान्य घेतल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला. पंजाबच्या होशियारपूरमधील शिधावाटप दुकानात एक व्यक्ती आला आणि त्याने दुकानदाराला शिधापत्रिका दाखवली. त्यानंतर, तिथून ४ गोणी धान्य घेतले आणि कारच्या डिक्कीत टाकले आणि तिथून निघून गेला. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (The person who came to get cheap ration from Mercedes whoever saw it was stunned watch video)

सुमित सैनी असे मर्सिडीजमधून धान्य देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी व्हिडीओमध्ये दिसणारी कार आपल्या नातेवाईकांची आहे. ते परदेशात असतात. त्यांची कार माझ्याच घराजवळ असते. कार डिझेलवर चालणारी असल्याने कधीतरी चालवून आणतो, असे सैनी यांनी सांगितले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या होशियारपूरमधील शिधावाटपाच्या दुकानाबाहेर असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर मर्सिडीजमधून येऊन शिधावाटप दुकानातून धान्य देणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, “शिधापत्रिका तयार करण्याचे काम धान्य पुरवठा विभाग करतो. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे. त्यांना धान्य द्या, अशा सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे आम्ही केवळ शिधावाटपाचे काम करतो. त्यांच्याकडे असलेली शिधापत्रिका कशी आणि कुठून आली, याची आम्हाला माहिती नसते”, असे दुकानदार अमित कुमार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – अनंत चतुर्दशीला विशेष लोकलच्या सेवेची व्यवस्था करावी; जयंत पाटलांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -