Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मातोश्री' भेटीनंतर केजरीवालांच्या 'आप'चा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता, नेमकं काय आहे कारण?

‘मातोश्री’ भेटीनंतर केजरीवालांच्या ‘आप’चा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता, नेमकं काय आहे कारण?

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यात असलेल्या आपची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली आहे.

अवघ्या १० वर्षांच्या कारकिर्दित अरवींद केजरीवाल यांच्या आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांची अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत मातोश्री या ठिकाणी येऊन भेट घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आपच्या राष्ट्रीय पक्ष दर्जाचे पुनरावलोकन केलं जात आहे. त्यामुळे आप पक्ष त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

आप पक्ष हा देशातील ८वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात ७ राष्ट्रीय पक्ष होते. ज्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. देशात राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त राज्यस्तरीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत.

- Advertisement -

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अनेक प्रकारच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक म्हणजे एखाद्या पक्षाचे लोकसभेत ४ सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीत त्याला ६ टक्के मतं मिळाली पाहिजे. तर दुसरीकडे ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ६ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दरम्यान, राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आपचे दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे गोव्यातही दोन आमदार आहेत.


हेही वाचा : भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 

- Advertisment -