Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देशातील तीन प्रमुख यंत्रणांच्या प्रमुखांचे पद रिक्त; जबाबदारी देण्याबाबत सरकार संभ्रमात

देशातील तीन प्रमुख यंत्रणांच्या प्रमुखांचे पद रिक्त; जबाबदारी देण्याबाबत सरकार संभ्रमात

Subscribe

देशातील प्रमुख यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या ईडी (ED), एसपीजी (SPG) आणि सीआयएसएफ (CISF) च्या प्रमुखांची पदे सध्या रिक्त आहेत.

नवी दिल्ली : देशातील अंत्यत महत्वाच्या अशा तीन प्रमुख यंत्रणांचे प्रमुखपद सध्या रिक्त आहे. या रिक्तपदावर कुणाला बसवावे या संभ्रमात मोदी सरकार असून, याबाबत कधी निर्णय घेतल्या जातो आणि कुणाकडे जबाबदारी सोपविली जाते याबाबत अद्याप स्पष्टता नाही हे विशेष. (The post of heads of three major agencies in the country is vacant Government confused about responsibility)

देशातील प्रमुख यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या ईडी (ED), एसपीजी (SPG) आणि सीआयएसएफ (CISF) च्या प्रमुखांची पदे सध्या रिक्त आहेत. कारण, ईडीचे संचालाक संजयकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ उद्या 15 सप्टेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यांचा मागील तीन वर्षापासून कार्यकाळ वाढविला जात होता. मात्र, आता त्यांचा कार्यकाळ वाढवू नये असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यांना फक्त आता उद्यापर्यंतच त्यांच्या पदावर राहता येणार आहे.

ईडीच्या संचालकांचा शोध संपेना

- Advertisement -

ईडीचे संचालक संजयकुमार मिश्रा यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात येऊ नये असे आदेश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला दुसरा कोणी अधिकारी मिळत नाही का? असे म्हटले होते. तेव्हापासून सरकार दुसऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेत आहे परंतू अद्याप त्यांची शोध मोहीम थांबली नसून, त्यांच्या जागी अधिकारी अद्याप तरी निश्चित झआला नाही.

हेही वाचा : हजारो वर्षे जे दबले-दडपले गेले होते, त्यांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे -भुजबळ

संजयकुमार मिश्रांकडे सोपविली जाणार मोठी जबाबदारी

- Advertisement -

केंद्र सरकारचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले संजयकुमार मिश्रा उद्यापर्यंत ईडीच्या संचालक पदावर असणार आहेत. दरम्यान ते निवृत्त होणार की, त्यांच्याकडे आणखी काही पदभार सोपविल्या जाणार याबाबत संभ्रम अशतानाच सरकार त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. कारण, त्यांना आता ईडीच्या प्रमुखपदासह सीबीआयचीही जबादारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet नं शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ

सीआयएसएफचे प्रमुखही झाले निवृत्त

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या सीआयएसएफचे प्रमुख शील वर्धनसिंह हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी 1989 च्या बॅचचे अधिकारी नीनासिंह यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र ही तात्पुरती व्यवस्था होती. आतापर्यंत नियमीत प्रमुख याही यंत्रणेला मिळाला नसल्याची माहिती आहे.

एसपीजीचे प्रमुखपदही रिक्त

सोबतच सरकारचे अंत्यत निकटवर्तीय राहलेले अधिकारी अरुणकुमार सिन्हा यांचेही याच महिन्यांत निधन झाले. ते पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. 2016 मध्ये त्यांना एसपीजीचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.

- Advertisment -