शौर्याला सलाम! हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानांची अभिमानास्पद कामगिरी; व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मिडियावर हाडं गोठवणाऱ्या थंडीतील एका जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्या भारतीय नागरिकास घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी' अशापद्धतीने सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी लाखो भारतीयांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओला मोठी पसंती दाखवली आहे.

The proud performance of the soldiers in the freezing cold; Video goes viral
शौर्याला सलाम! हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानांची अभिमानास्पद कामगिरी; व्हिडीओ व्हायरल

हल्ली सोशल मिडियावर अनेक गोष्टी क्षणात व्हायरल होत असतात. त्यातच देशप्रेम व्यक्त करणाऱ्या व्हिडीओ ह्या बऱ्याच व्हायरल होतात. त्यासोबतच जवान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनं देशभक्तीने दाटून येते.प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी आपले भारतीय सैनिक करत असतात. सध्या सोशल मिडियावर हाडं गोठवणाऱ्या थंडीतील एका जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्या भारतीय नागरिकास घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ अशापद्धतीने सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी लाखो भारतीयांनी सोशल मिडियावर एका जवानाच्या व्हिडिओला मोठी पसंती दाखवली आहे.

अंत्यत कठीण परिस्थितीत एका खडकाप्रमाणे खंबीरपणे सामोरे जाणारे उदाहरण या जवानांच्या व्हायरल व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. भारतीय लष्कराचा एक जवान थंडीत बर्फाच्या वादळात आपले कर्तव्य बजावताना पाहायला मिळतं आहे.भारतीय लष्काराचा हा जवान बर्फात उभा राहून देशाच्या सीमेवर लक्ष ठेवताना पाहायला मिळत आहे. या बर्फाच्या वादळात एक भारतीय सैनिक हातात रायफल घेऊन,गुडघ्यापर्यंत बर्फ साचला असून, खंबीरपणे उभा आहे.

हा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. या जवानाच्या अभिमानास्पद कामगिरीच्या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.या व्हिडीओला 50,000 हून अधिक लाईक्स आणि 11,000 हून अधिक रिट्विट करण्यात आले आहे. याशिवाय, या व्हिडीओवर हजारो कमेंट आल्या आहेत.


हेही वाचा – ताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद