नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान – 3 मोहीमे यशस्वीपणे चंद्रावर उतरले आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली आहे. चांद्रयान – 3 च्या यशनंतर जगभरात इस्रोच्या शास्रज्ञांचे कौतुक होत आहे. “चांद्रयान – 3 मोहिमेसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागली” अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.
एस. सोमनाथ म्हणाले, “चांद्रयान – 2ने हार्ड लँडिंग केले होते. यामुळे चांद्रयान – 2 या मोहिमेतून काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागली. चांद्रयान – 2 मोहिमेत आमच्याकडून काय चुका झाल्या होत्या. ते शोधण्यात एक वर्ष गेली होती. यानंतर नव्याने सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेक चाचण्या घेतल्या होत्या. पण कोरोना काळामुळे आंतराळ संशोधन मोठा फटका बसला होता. कोरोनामुळे कामचे सर्व काम देखील थांवण्यात आली होती.”
हेही वाचा – Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे ‘त्या’ ब्रिटिश पत्रकाराचे तोंड झाले बंद
कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. पण दक्षिण ध्रुव हा विषुववृत्तीय प्रदेशापासून दूर असून मोठे खड्डे आणि खोल दरे आहेत. दक्षिण ध्रुवावर सपाट पृष्ठभाग शोधणे खूप अवघड आहेत, असे सोमनाथ सांगितले.
हेही वाचा – Chandrayan 3 : चंद्रावरून आला रोव्हर ‘प्रज्ञान’चा पहिला फोटो; INSPACE च्या अध्यक्षांनी केला शेअर
चंद्रावर पाणी आणि खनिजे शोधण्यासाठी
“पुढील 14 दिवस हे अत्यंत महत्त्वाची असून रोव्हर हा चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. यावेळी वेगवेगळे प्रयोग केले जातील आणि चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. ही वेगवेगळी कामे करण्यासाठी लँडरबरोबर पाच पेलोड पाठविले आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजे असण्याची शक्यता आहे. यासंबधित संशोधन करेल आणि प्रमुख संशोधनासाठी चांद्रयान पाठविले आहे”, असेही सोमनाथ म्हणाले.