घरताज्या घडामोडीगेल्या २४ तासांत बरे झाले १३ हजार ९४० रुग्ण; रिकव्हरी रेट ५८.२४...

गेल्या २४ तासांत बरे झाले १३ हजार ९४० रुग्ण; रिकव्हरी रेट ५८.२४ टक्के

Subscribe

गेल्या २४ तासांत देशभरात १३ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३६ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १३ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३६ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर रिकव्हरी रेट ५८.२४ इतका झाला आहे.

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी २४ तासांत कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात मागील २४ तासांत १७ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ५८.३४ टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा’ SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकाम! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -