घरदेश-विदेशभौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, तीन वैज्ञानिकांना मिळाला संयुक्त सन्मान

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, तीन वैज्ञानिकांना मिळाला संयुक्त सन्मान

Subscribe

पुढील आठवडाभर विविध क्षेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. उद्या, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. तर, नोबेल शांती पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. तर, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

नोबेल पुरस्कारांच्या घोषणांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी भौतिकी विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने एलन एस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर, आणि एंटोन जिलिंगर यांना पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा आठवडाभर करण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र या पाच क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.

सोमवारपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. औषधोपचार क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडिश वैज्ञानिक स्वंते पाबो यांना जाहीर झाला. निअँडरथल डीएनएवरील शोधासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. क्वाटंम मॅकॅनिक क्षेत्रात या अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल भौतिकाशास्त्रातील पुरस्कार एलन एस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर, आणि एंटोन जिलिंगर देण्यात आला आहे.

- Advertisement -


तर, पुढील आठवडाभर विविध क्षेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. उद्या, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. तर, नोबेल शांती पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. तर, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -