घरताज्या घडामोडीयेत्या काही वर्षांत पाकिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा इशारा

येत्या काही वर्षांत पाकिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा इशारा

Subscribe

येत्या काही वर्षांत पाकिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम आश्चर्यकारक असल्यामुळे देशाला समोर येणाऱ्या पुरपरिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. पाकिस्तानात पूरग्रस्त परिस्थितीमुळे आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर घरांचेही अधिक नुकसान झाले आहे. ३३ दशलक्ष लोकसंख्या बाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचे आवाहन केले आहे.

हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे. माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान म्हणाले की, अतिवृष्टीमुळे 33 दशलक्षाहून अधिक लोक उद्ध्वस्त झाले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे, परंतु हवामान बदलामुळे भयानक परिस्थितीचा सामना करणाऱ्या देशांच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर आहे. शरीफ म्हणाले की, देशाला झालेल्या आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जात आहे, जो अब्जावधींमध्ये आहे.

पर्यावरणवाद्यांचा इशारा

- Advertisement -

कराचीतील पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सीमा जिलानी यांनी इशारा दिलाय की, हवामान बदलाचे परिणाम धक्कादायक आहेत. पाकिस्तान आणि जगाच्या इतर भागात जे काही घडत आहे ते हवामान बदलाचा परिणाम आहे. डॉ. जिलानी आणि कराची विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमीर आलमगीर यांसारखे इतर तज्ञ सुरक्षा आणि हवामान बदलावर संशोधन करत आहेत.


हेही वाचा : धक्कादायक! कामावरून काढून टाकल्याने इंदूरमध्ये 7 कर्मचाऱ्यांची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -