घरताज्या घडामोडीBudget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार कोसळला

Budget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार कोसळला

Subscribe

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजाराच्या पडझडीला सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता दिवस संपताना यामध्ये काही वाढ होते का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला आणि ४०,५७६ वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी १२६.५० अंकांनी कोसळला आणि ११,९१० वर स्थिरावल्याचा पहायला मिळाला.


हेही वाचा – LIVE – Budget 2020 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार बजेट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -