घरअर्थजगतशेअर बाजार गडगडला, दोन दिवसांत १७०० अंकांची घसरण

शेअर बाजार गडगडला, दोन दिवसांत १७०० अंकांची घसरण

Subscribe

मुंबई – आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला आहे. आज बाजारात सेन्सेक्स ८७२ अंकांनी तर निफ्टी २६८ अंकांनी घसरला आहे. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा झाला आहे. आजच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील भांडवली मुल्य २८०.५२ लाख कोटींवरून २७४.०२ लाख रुपयांवर पोहोचलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आली होती. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात खरेदी केली जात आहे. मात्र, असं असतानाही दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये जवळपास १७०० अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूदारांना मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

TATA Cons. Prod- 0.89 टक्के, ITC- 0.77 टक्के, Coal India- 0.53 टक्के, Britannia- 0.38 टक्के, Nestle- 0.06 टक्के या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर, Tata Steel- 4.54 टक्के , Asian Paints- 3.81 टक्के, Adani Ports- 3.62 टक्के, Tata Motors- 3.48 टक्के, JSW Steel- 3.25 टक्के कंपन्यांमध्ये घसरण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -