घरअर्थजगतबँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप अखेर मागे, कामगार आयुक्तांच्या बैठकीत काय ठरलं?

बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप अखेर मागे, कामगार आयुक्तांच्या बैठकीत काय ठरलं?

Subscribe

Bank strike called off | आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी ३० आणि ३१ जानेवारी रोजी दोन दिवसीय संप पुकारणार होते.

Bank strike called off | मुंबई – बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला नियोजित देशव्यापी संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. मुंबईत उपमुख्य कामगार आयुक्तांच्या भेटीनंतर भेटीनंतर हा संप पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी ३० आणि ३१ जानेवारी रोजी दोन दिवसीय संप पुकारणार होते.

पाच दिवसांचा आठवडा करणे, पेन्सनचे अद्ययावतीकरण, जुनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) रद्द करणे, वेतन सुधारणा, सर्व विभागात पुरेशी भरती करणे आदी विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ जानेवारी दरम्यान दोन दिवसीय संप पुकारणार असल्याचे आवाहन केले होते. AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC या UFBU च्या घटक संघटनांचे सदस्य देशव्यापी बँक संपावर जाणार असल्याची माहिती देत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने हा संप जाहीर केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी ‘या’ दोन दिवशी जाणार संपावर

मात्र, २७ जानेवारी रोजी मुंबईत कामगार आयुक्तांसोबत दुसऱ्यांदा बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने हा संप मागे घेण्यात येत असल्याची माहिती एमपी बँक्स एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष व्हीके शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, आज महिन्याचा शेवटचा शनिवार असल्याने बँक बंद आहेत. उद्या रविवार असल्याने बँक बंद असणार आहे. तर हा संप पुकारला गेला असता तर मंगळवारपर्यंत बँका बंद राहिल्या असत्या. त्यामुळे बँकिंग कामकाजावर मोठा परिणाम झाला असता. परंतु, हा संप मागे घेतल्याने खातेदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -