Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगची जगभराने घेतली दखल; एलन मस्कपासून NASA पर्यंत सगळेच...

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगची जगभराने घेतली दखल; एलन मस्कपासून NASA पर्यंत सगळेच म्हणतात..

Subscribe

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर चांद्रयान-3 ची यशस्वी लॅंडिंग केल्यानंतर जगानेही भारताच्या कामगिरीला सलाम केला आहे.

नवी दिल्ली : स्वप्नवत असलेली मोहिम भारताने काल चांद्रयान-3 च्या रुपाने सत्यात उतरवल्यानंतर देशभरात याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या यशाची फक्त भारतानेच नाही तर संपूर्ण जगाने दखल घेतली असून, ट्वीटरचे प्रमुख एलन मस्कपासून तर अमेरिकेची संशोधन संस्था नासा (NASA) ने सुद्धा भारतीय आंतरराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) च्या कामगिरीचे कौतूक केले आहे. (The successful landing of Chandrayaan-3 took worldwide notice; Everyone from Elon Musk to NASA says..)

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर चांद्रयान-3 ची यशस्वी लॅंडिंग केल्यानंतर जगानेही भारताच्या कामगिरीला सलाम केला आहे. या कामगिरीमुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण, भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यान उतरविल्यामुळे जगात हा पहिल्या क्रमांचा देश झाला आहे.

एलन मस्कनेसुद्धा केले अभिनंदन

- Advertisement -

भारताच्या या यशानंतर ट्वीटरचे प्रमुख एलन मस्क यांनी भारताचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, भारताना या यशासाठी खुप खुप शुभेच्छा असे ट्वीट करीत यासोबतच तिरंग्याचे एक इमोजीसुद्धा शेअऱ केले आहे.

हेही वाचा : चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसोबतच भारताचे आणखी एक यश; वाचा- कोणते परीक्षण झाले यशस्वी?

सुंदर पिचाई म्हणतात अविस्मरणीय क्षण

- Advertisement -

एलन मस्कनंतर गुगल आणि अलफाबेटचे प्रमुख सुंदप पिचाई यांनी ट्वीटमध्ये लिहले आहे की, हा क्षण अविस्मरणीय होता. चंद्रावर यशस्वी लॅंडिंगच्या शुभेच्छा. आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रृवार सॉफ्ट लॅंडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. तर पिचाई यांच्या ट्वीटला रिप्लाय देत एलन मस्क यांनी सुपर कुल असे लिहले आहे.

हेही वाचा : Chandrayaan 3 लँडिंगसाठी दक्षिण ध्रुव निवडण्यामागे ‘हे’ आहे कारण; एस. सोमनाथ म्हणाले…

बिल गेट्सनेही केले कौतूक

जगातील श्रीमंताच्या यादीत राहणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्तीपैकी एक असलेल्या बिल गेट्सनेही भारताच्या यशाचे कौतूक केले आहे. बिल गेट्सने ट्वीट करत म्हटले आहे की, मून शॉट्स वर्क, चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वी लॅंडिंगमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन.

नासाने म्हटले आम्ही सहयोगी

भारताच्या या यशानंतर नासाचे प्रशासकीय प्रमुख बिल निलसनने ट्वीट करत म्हटले की, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीरित्या उतरल्यामुळे अभिनंदन. आम्हाला या मोहिमेत तुमचे सहयोगी झाल्याचा आनंद वाटत असल्याचे म्हणत त्यांनी आपण भारताला मदत केल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हणून दाखविले आहे.

- Advertisment -