घरदेश-विदेशनैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल- पंतप्रधान मोदी

नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल- पंतप्रधान मोदी

Subscribe

गुजरात सूरत येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाला हजारो शेतकरी आणि सूरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करुन यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक देखील सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीमधील तब्बल 75 शेतकऱ्यांना नैसर्गित शेतीशी जोडण्याचे सूरतचे यशस्वी मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.(the surat model of natural farming pm modi)

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आपला भारत देश अनेक लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. यामुळे आगामी काळात अेक परिवर्तन घडून येईल. देशाचा प्रगतीचा पाया तसेच वेग यामागे ‘सबका प्रयास’ची भावना आहे. आणि आपल्या विकासाच्या यात्रेचे नेतृत्व करत आहे.

- Advertisement -

कार्यक्रमामध्ये बोलतांना पंतप्रधानांनी ‘जल जीवन’ मिशन या योजनेचे उदाहरण देत जिथे लोकांना महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. यासह ‘डिजिटल इंडिया’ मिशनचे अभूतपूर्व यश हे खेडेगावात बदल घडवणे सोपे नाही असे म्हणाऱ्यांना देशानेच दिलेले उत्तर आहे. यासह भविष्यात नैसर्गिक शेतीबाबततचे जनआंदोलन येत्या काळातही मोठे यश मिळवेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला

- Advertisement -

हे हि वाचा – गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री कामत यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -