मंदिराच्या जागेवर ताजमहाल बांधलेले नाही, भारतीय पुरातत्व विभागाची महत्त्वपूर्ण माहिती

ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. माहिती अधिकार ही माहिती देण्यात आली आहे.

tajmahal reopens after 188 days first tourist chinese new rule agra

ताजमहालच्या बंद (TajMahal)खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या खोल्या असल्याचा दावा हिंदू संघटनाकडून केला जातोय. तसेच, शिवमंदिर (Shiva Temple) पाडून ताजमहाल बांधण्यात आल्याचंही म्हटलं जातं. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (Archaeological Survey of India) दिलेल्या माहितीनुसार, ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नसून, ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. माहिती अधिकार ही माहिती देण्यात आली आहे. (The Taj Mahal is not built on the site of the temple, important information from the Archaeological Survey of India)

हेही वाचा – आज तुम्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केलीय, उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये …

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. त्यांच्या आरटीआयला भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण उत्तर दिलं आहे. या माहिती अधिकारांतर्गत दोन प्रश्नांची माहिती मागवली होती. ताजमहालच्या जमिनीवर मंदिर नसल्याचा पुरावा आणि तळघरातील २० खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती असल्याचा पुरावा मागितला होता. मात्र, यावर भारतीय पुरातत्व विभागाने एका ओळीत उत्तर पाठवले आहे. साकेत गोखले यांनी फेसबूकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – Taj Mahal Controversy : ताजमहालच्या 22 खोल्यांच्या वादात ASI ने प्रसिद्ध केले फोटो; हे वास्तव आले समोर

साकेत गोखले यांच्या पोस्टमध्ये काय आहे?

  • मंदिराच्या जागेवर ताजमहाल बांधण्यात आलेला नाही.
  • ताजमहालच्या आतमध्ये मूर्ती असलेल्या ताळेबंद खोल्या नाहीत.

भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या या माहितीची दखल न्यायालय आणि जनतेने घ्यावी, असंही साकेत यांनी म्हटलं आहे. तसेच, ताजमहालचा मुद्दा उपस्थित करून भाजप, हिंदुत्त्व गट यांच्याकडून तणाव निर्माण केला जात होता, त्यांचा हा मनसुबा आता खोडून काढला जाईल, असंही ते म्हणाले.

ताजमहालच्या बंद खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जात होता. त्यामुळे ताजमहालला तेजो महालय मंदिर असंही म्हणण्यात येत होतं. हिंदू संघटनेचा हा दावा प्रचंड चर्चेत होता.

दरम्यान, अयोध्येतील एका भाजप नेत्याने उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात तळघरे उघडण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती. आग्र्याच्या ताज महालमधील 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने यावेळी याचिकाकर्त्यांना झापले. आज तुम्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे, उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे हायकोर्टाने म्हटले आहे.