Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश शिक्षिकेने अकरावीच्या विद्यार्थ्याबरोबर काढला पळ,कॉलेज बंद असल्यामुळे घरातच घेत होती लेक्चर्स!

शिक्षिकेने अकरावीच्या विद्यार्थ्याबरोबर काढला पळ,कॉलेज बंद असल्यामुळे घरातच घेत होती लेक्चर्स!

मुलाकडील सदस्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आता या महिला शिक्षिकेविरोधात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Story

- Advertisement -

एका व्यक्तीच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकच मुलांना चांगली शिकवण देतात त्यांना भविष्यात पुढे जाण्यास मदत करतात. पण नुकतीच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या (Student Teacher Relation) नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एक 17 वर्षीय मुलगा आणि वर्ग शिक्षिका पळून गेल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.सदर घटना हरियाणा येथील असून पानिपत मध्ये घडली आहे. लॉकडाउन असल्या कारणास्तव महिला शिक्षिकेच्या घरीच क्लाससाठी मुलगा शिकण्यास जात असे. तसेच शिक्षिका घटस्फोटीत असून तिच्या आईकडे वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे.29 मे रोजी मुलगा नेहमिप्रमाणे क्लासमध्ये गेला असता तिथून न परतल्याने घरच्यांनी शिक्षिकेच्या घरी चौकशी केली. मात्र शिक्षिकेच्या घरच्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शिक्षिका सुद्धा गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
दरम्यान मुलाकडील सदस्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आता या महिला शिक्षिकेविरोधात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघांचाही पोलीस तपास करत आहेत, मात्र आतापर्यंत कोणतेच धागेदोरे हाती लागले नाहीत. गायब झाल्यापासून दोघांचेही फोन बंद आहेत.
29 मे पासून दोघांचाही पत्ता लागला नाहीये आणि विशेष बाब म्हणजे दोघांकडेही मौल्यवान अशा कोणत्याही वस्तू किंवा पैसे नाहीत, महिला शिक्षिकेचा हातात केवळ एक अंगठी आहे, असे सांगण्यात आले. उपजीविकेसाठी दोघांकडे काहीही नसल्यामुळे तसेच इतके दिवस दोघांचाही थांगपत्ता न लागल्यामुळे लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


हे हि वाचा – ‘हिजाब’मूळे सना खान होतेय ट्रोलिंगचा शिकार,शेवटी पडद्यामागे राहतेय ट्रोलेर्सने केली कमेंट

- Advertisement -