युकेत तिसऱ्या लाटेचा धोका, ‘या’मुळे भारतावरही होऊ शकतो परिणाम?

The third wave in the UK will affect India
युकेत तिसऱ्या लाटेचा धोका, 'या'मुळे भारतावरही होऊ शकतो परिणाम?

भारतात सध्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात भारताला यश देखील येत आहे. कारण काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. तसेच लसीकरण मोहिमेला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकीकडे दिलासा मिळत असला तरी तिसऱ्या लाटेचे संकट येणार असल्याचे बोले जात आहे. तर युकेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकटही आले आहे. त्यामुळे याचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. तर ही वाढ B.1.617.2 व्हेरिएंटमुळे होत असल्याचे समोर आले आहे. हा नवीन प्रकार असून यामुळे युकेमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. B.1.617.2 या व्हेरिएंटमुळे कोरोना वेगाने पसरत असून गेल्या आठवडाभरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर नॉर्थ वेस्टमध्ये हा आकडा २५ टक्के आहे. तर स्कॉटलँडमध्ये हा आकडा त्याहून जास्त आहे. विशेष म्हणजे युकेचा ट्रेंड पाहिल्यास तरुणांमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यातच भारतात देखील तिसरी लाट ही तरुणांसाठी घातक असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे भारतात देखील कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युकेतील लसीकरण

युकेत आतापर्यंत ३.८ कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर २.४ कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर महत्त्वाची बाब म्हणजे लसीकरणामुळे ज्येष्ठांमधील संसर्गाचा दर आणि प्रकरणे कमी झाली आहेत. तसेच पहिल्या लाटेच्या तुलनेत आकडा बराच कमी असून रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही ६० ते ७० टक्क्यांनी कमी आहे.

भारतावर काय होऊ शकतो परिणाम

युकेचा ट्रेंड पाहिल्यास तिथे तरुणांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आधीच तिसऱ्या लाटेत कोरोनाचा जास्त धोका हा तरुणांना असल्याची चिंता भारतातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरणाचा कमी वेग ही भारतासाठी एक चिंतेची बाब ठरु शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, “आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे. मात्र, केवळ ४ कोटी लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच देशातल्या केवळ ३.१ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही”.


हेही वाचा – Corona Update : चिंता मिटली! देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक