घरताज्या घडामोडीCOVID 19 tests: देशात आतापर्यंत १ कोटी ८८ लाखाहून अधिक चाचण्या!

COVID 19 tests: देशात आतापर्यंत १ कोटी ८८ लाखाहून अधिक चाचण्या!

Subscribe

देशभरात २४ तासांत ६ लाख ४२ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ४२ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देशात २४ तासांत ५५, ०७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५५ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७७९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३५ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ झाली आहे तर सध्या ५ लाख ४५ हजार ३१८ Active रूग्ण आहेत. तसेच १० लाख ५७ हजार ८०६ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केला असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चीनला आणखी एक झटका! चीनसह ‘या’ देशांतील Colour TV च्या आयातीवर बंदी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -