घरट्रेंडिंगजगातील हे १२ विषाणू आहेत सर्वात धोकादायक

जगातील हे १२ विषाणू आहेत सर्वात धोकादायक

Subscribe

वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील जवळपास ६ लाख विषाणु शोधले आहेत जे प्राण्यांमधून मानवांमध्ये प्रवेश करतात.

जगाची निर्मिती झाल्यापासून विषाणू अस्तित्वात आहेत. काही असे विषाणू आहेत जे बहुधा मानवाच्या उत्पत्तीआधी अस्तित्वात आले आहेत. सायंटिफिक अमेरिकन मासिकानुसार, वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील जवळपास ६ लाख विषाणू शोधले आहेत जे प्राण्यांमधून मानवांमध्ये प्रवेश करतात. मनुष्य या विषाणूंच्या हल्ल्यांशी सतत झुंज देत आहे. परंतु मानव डोळ्यांना न दिसणाऱ्या या शत्रूसमोर नेहमी हरला आहे. असेच काही विषाणू आहेत जे मानवांवर हल्ला करतात.

१) मारबर्ग विषाणुचा शोध १९६७ मध्ये लागला होता. हा विषाणू माकडांपासून मानवांमध्ये आला. जेव्हा जर्मन प्रयोगशाळेत हा विषाणू लिक झाला तेव्हा तेथील काही लोक आजारी पडले. त्यानंतर मारबर्ग विषाणुचा शोध लागला. मारबर्ग विषाणुमुळे मानवांमध्ये उच्च ताप येतो. शरीरातील अवयवांमधून रक्त बाहेर पडायला लागते. यासह, अनेक अवयव कार्य करणे थांबवतात. माणसाचा मृत्यू होतो. आजारी लोकांपैकी ८० टक्के लोकांचा मृत्यू होतो.

- Advertisement -

२) इबोला विषाणुचा शोध १९७६ मध्ये लागला जेव्हा कांगो आणि सुदानमध्ये मृत्यू झाला होता. हा विषाणू देखील प्राण्यांपासून मानवांमध्ये आला. यामुळे आजारी असलेले ५० ते ७० टक्के लोक मरतात. २०१४ मध्ये ते आफ्रिकेत अतिशय भयंकर पातळीवर पसरला होता.

३) रेबीज पाळीव प्राण्यांपासून होतो. सर्वसाधारणपणे कुत्र्यांनी चावल्यावर हा रोग होतो. हे १९२० मध्ये उघडकीस आलं. विकसित देशांमध्ये अशी प्रकरणं उघडकीस येत नाहीत, परंतु भारत आणि आफ्रिका देशांमध्ये हा विषाणू अनेकदा लोकांचा बळी घेतो. जर आपल्याला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत तर हा विषाणू 100 टक्के लोकांचा बळी घेतो.

- Advertisement -

४) एचआयव्ही हा आधुनिक जगातील सर्वात धोकादायक विषाणू आहे. या विषाणुचा संसर्ग झाल्यानंतर आजपर्यंत कोणीही जगू शकलेलं नाही. या विषाणुमुळे आजारी असलेल्या ९५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. १९८० पासून जगभरात सुमारे ३२० दशलक्ष लोक एचआयव्हीमुळे मरण पावले आहेत. मानवी इतिहासामध्ये यापेक्षा जास्त मृत्यू कोणत्याही विषाणुने झालेले नाहीत.

५) चेचक हा एक आजार आहे जो हजारो वर्षांपासून मानवांना त्रास देत आहे. १९८० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने याचा शेवट करण्यासाठी मोहीम राबवली आहे. परंतु आजही, जर तीन लोकांना विषाणुची लागण झाली, तर त्यापैकी एकाचा मृत्यू होतो. २० व्या शतकात, चेचकमुळे ३० करोड लोक मरण पावले.

६) हंता विषाणु १९९३ मध्ये समोर आला, जेव्हा अमेरिकेत एक तरुण आणि त्याची मंगेतर संक्रमित झाल्यानंतर काही दिवसांतच मरण पावली. काही महिन्यांत अमेरिकेतील ६०० लोकांना या आजाराची लागण झाली आणि त्यात ३६ टक्के लोक मरण पावले. हा रोग उंदरांद्वारे पसरतो. कोरियन युद्धाच्या वेळी हंता विषाणुमुळे ३००० सैनिक आजारी होते, त्यातील १२ टक्के लोक मरण पावले.

७) इन्फ्लूएंझामुळे जगात दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांचा मृत्यू होतो. परंतु कधीकधी एक नवीन इन्फ्लूएन्झा व्हायरस येतो जो एक महामारी बनतो. १९१८ च्या स्पॅनिश फ्लूप्रमाणे. यामुळे, जगातील ४० टक्के लोक आजारी पडले होते. जवळपास ५ कोटी लोक ठार झाले. जर इन्फ्लूएंझाचा एक नवीन विषाणू आला तर तो अधिक नाश करेल.

८) डेंग्यू हा डास चावल्यानंतर होतो. हे प्रथम १९५० मध्ये समजलं जेव्हा फिलीपिन्स आणि थायलंडमध्ये पसरला होता. सध्या जगातील ४० टक्के लोक डेंग्यूचं साम्राज्य असलेल्या ठिकाणी राहतात. यामुळे दरवर्षी ५० लाख ते १ करोड लोक आजारी पडतात. हा इबोला रक्तस्त्राव तापात रुपांतर करू शकतं. योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू निश्चित आहे. यामुळे, एकूण आजारी लोकांपैकी २० टक्के लोक मरण पावले आहेत.

९) रोटा विषाणु मुलांसाठी सर्वात धोकादायक आहे. यामुळे मुलांना अतिसार आणि न्यूमोनिया होतो. हा विषाणू तोंडातून किंवा गुद्द्वारातून शरीरात जातो. विकसित देशांमध्ये नाही, परंतु विकसनशील देशांमध्ये या विषाणूमुळे हजारो मुलं मरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी सुमारे ४ लाख मुलांचा मृत्यू होतो.

१०) २००३ मध्ये चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातून सार्स उदयास आला. हा विषाणू वटवाघाळांपासून मनुष्यात आला आहे. दोन वर्षात सार्समुळे २६ देशांमधील ८००० लोक आजारी होते. यापैकी ७७० लोक मरण पावले. हा कोरोना विषाणूचा पूर्वज आहे. यामुळे, एकूण आजारी लोकांपैकी ९.६ टक्के लोकांचा मृत्यू होतो. उपचार न केल्यास त्यातही वाढ होऊ शकते.

११) मर्स प्रथम सौदी अरेबियामध्ये २०१२ मध्ये पसरला. त्यानंतर २०१५ मध्ये दक्षिण कोरियामध्ये. सार्स आणि कोरोना व्हायरस कोविड -१९ च्या संबंधीत आहे. हा उंटातून मानवांमध्ये आला. त्याची लक्षणं कोरोना विषाणुसारखीच आहेत. यामुळे निमोनिया होतो आणि एकूण आजारी लोकांपैकी ३० ते ४० टक्के लोकांचा मृत्यू होतो.

१२) सार्स-सीओव्ही २ म्हणजेच कोरोना विषाणु म्हणजेच कोविड -१९ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समोर आला. चीनच्या वुहान शहरापासून तो जगभर पसरला. यामुळे, आतापर्यंत एकूण आजारी लोकांपैकी जवळपास ३ टक्के लोकांचा बळी गेला आहे. हा जगभरात पसरला आहे. यामुळे आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोक आजारी आहेत. ६९ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -