घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus : दोन बलाढ्य देशांनी कोरोना समोर हात टेकले!

CoronaVirus : दोन बलाढ्य देशांनी कोरोना समोर हात टेकले!

Subscribe

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे ११ लाख ३१ हजार ८५६ रुग्ण आढळून आले आहेत. येथे ६५ हजार ७८२ जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख ६१ हजार ६६६ रुग्ण बरे झाले.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ब्रिटनचीही स्थिती फारशी वेगळी नसून तिथे बरे होण्याचे प्रमाण ०.२० टक्के एवढेच आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे ११ लाख ३१ हजार ८५६ रुग्ण आढळून आले आहेत. येथे ६५ हजार ७८२ जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख ६१ हजार ६६६ रुग्ण बरे झाले. २७ एप्रिलला येथे २३ हजार १९६ नवे रुग्ण समोर आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हि संख्या वाढत गेली. दररोज नव्या रुग्णांची संख्या २५ हजाराहून जास्त होती. १ मे रोजी पाच दिवसांत सर्वाधिक ३६ हजाराहून अधिक झाली होती. त्याचाच अर्थ संसर्गाचे प्रमाण ५५ टक्के वाढले. मृत्यूचा दर कमी-अधिक झाला. २७ एप्रिलला येथे १ हजार ३८३ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पाच दिवसानंतर सर्वाधिक २ हजार ४७० व १ मे रोजी १८९७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला ब्रिटन हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे.

येथील सरकार बरे होणाऱ्या रुग्णांचे आकडे जाहीर करत नाही, परंतु वल्डोमीटरच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत केवळ ३४४ जण बरे झाले आहेत. खरे तर ब्रिटनमध्ये १ लाख ७७ हजार ४५४ रुग्ण आढळून आले आहेत, तर २७ हजार ५१० जणांचा मृत्यू झाला आहे. येथे १ लाख ४९ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राजधानी लंडनमधील चांगल्या रुग्णालयाची स्थिती देखील दयनीय बनली आहे. येथे रुग्णांना जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. दररोज एक लाख नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट्यही पूर्ण होणे शक्य नसल्याचे सरकारने मान्य केले आहे. खरे तर एप्रिलच्या सुरुवातीला सरकारने हे लक्ष्य ठेवले होते. न्यायमंत्री रॉबर्ट बकलँड म्हणाले, आम्ही तपासणी वाढवत आहोत. भलेही त्याची उद्दिष्ट्यपूर्ती आज झाली नाही तरी चालेल. एक लाख नमुन्यांची तपासणी महत्त्वाची आहे. परंतु तूर्त आम्ही तपासणी करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

११५ मीटपॅकिंग प्रकल्पात ४ हजार १९३ कर्मचारी बाधित

अमेरिकेत ११५ मीटपॅकिंग प्रकल्पातील ४ हजार १९३ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. आरोग्य संस्था सीडीसीच्या म्हणण्यानुसार, बाधित रुग्णांपैकी २० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मीट व पोल्ट्री उद्योगात सुमारे ५ लाख लोक काम करतात. येथे फिजिकल डिस्टन्सिंग योग्य पालन केले जात नाही. गेल्या महिन्यात मीट प्रोसेसिंग प्रकल्पाला लॉकडाऊनमुळे बंद करण्याचे दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -