Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार

दिल्लीत झाल्या बैठका, विविध केंद्रीय मंत्र्यांच्या मंत्रालयांच्या कामगिरीचा घेतला आढावा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी दिल्लीत काही बैठका झाल्या. विविध केंद्रीय मंत्र्यांच्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी या बैठका होत्या. विशेषत: या बैठका कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान घेण्यात आल्या.

शुक्रवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमवेत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीच्या आढावा घेण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार यामध्ये मोठ्या बदलांचे संकेत देण्यात आले. याबाबत अजून केंद्राने अधीकृत माहिती दिलेली नाही. उत्तर प्रदेशसह पुढील वर्षी होणार्‍या महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकांसाठी मोदी सरकार जोमाने तयारी करत आहे. तसेच येत्या काही दिवसांत मोठी सामाजिक योजना जाहीर करण्याचीही चर्चा आहे.

- Advertisement -