घरदेश-विदेशराहुल गांधींवरील कारवाई म्हणजे गांधीवादी विचारांचा 'विश्वासघात'; अमेरिकेच्या खासदाराची प्रतिक्रिया

राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे गांधीवादी विचारांचा ‘विश्वासघात’; अमेरिकेच्या खासदाराची प्रतिक्रिया

Subscribe

संयुक्त राष्ट्राकडून अमेरिका खासदाराचे विधान समोर आले आहे. प्रभावशाली भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्याचा निर्णय हा गांधीवादी विचारसरणीचा 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोषी ठरवणे आणि नंतर त्यांची खासदारकी रद्द करणे या मुद्द्यांवरून देशातील विरोधक एकवटून सत्ताधारी पक्ष भाजपवर निशाणा साधत असतानाच आता संयुक्त राष्ट्राकडून अमेरिका खासदाराचे विधान समोर आले आहे. प्रभावशाली भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्याचा निर्णय हा गांधीवादी विचारसरणीचा ‘विश्वासघात’ असल्याचे म्हटले आहे.

तत्त्वज्ञान आणि भारताच्या गहन मूल्यांचा घोर विश्वासघात आहे. ही ती लोकशाही नाही ज्याच्यासाठी माझ्या आजोबांनी आयुष्याची बरीच वर्षे तुरुंगात घालवली होती. रो खन्ना हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करतात. खन्ना हे भारत आणि भारतीय-अमेरिका यूएस काँग्रेसनल कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

दुसर्‍या ट्विटमध्ये रो खन्ना म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या हितासाठी हा निर्णय मागे घेण्याची ताकद तुमच्याकडे आहे. अमेरिकेतील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे उपाध्यक्ष जॉर्ज अब्राहम यांनी राहुल यांच्या अपात्रतेला भारतातील लोकशाहीसाठी दुःखद दिवस म्हटले आहे. भारतातील लोकशाहीसाठी हा दु:खद दिवस आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द करुन मोदी सरकार भारतीयांच्या अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याच्या अधिकारांवर घाला घालत आहे.

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दिलेल्या शिक्षेचे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रात पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेसचे प्रवक्ते फरहान हक यांनी शुक्रवारीच या विषयावर वक्तव्य केले. ते म्हणाले होते की काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याच्या आणि त्यांच्या पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केल्याच्या वृत्ताची संयुक्त राष्ट्रांना माहिती आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘मोदी आडनाववाले सर्व चोर’ हे राहुल गांधींचे विचारपूर्वक विधान, रवीशंकर प्रसाद यांची टीका )

या प्रकरणात राहुल गांधींना झाली शिक्षा

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठेलाच आव्हान दिल्याचा त्यांचा आरोप त्यांनी केला होता. वायनाडचे लोकसभा सदस्य राहुल यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत मोदी आडनावावरुन वक्तव्य केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -