देहरादून | पीएम नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बहिनींच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी यांची बहिण वसंतीबेन नीलकंठ आणि योगी आदित्यानथ यांची बहिण शशी देवी या दोघींची भेट उत्तराखंडचे गढवाल येथील मंदिरात भेट झाली. या पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांच्या बहिणींची भेट झाली असून यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधानांची बहिण वसंतीबेन या त्यांच्या कुटुंबासोबत तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी गेल्या आहेत. सध्या वसंतीबेन या ऋषिकेशल आहेत. यावेळी दयानंद आश्रममध्ये थांबवल्या होत्या. तेव्हा वसंतीबेन यांनी कुटुंबासोबत नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिराचे दर्शन घेऊन पूजा करून परतत असताना योगी आदित्यनाथ यांची बहिण शशी देवी यांची एका दुकात भेट झाली. या दोघींच्या भेटीचा व्हिडीओ भाजप नेता अजय नंदा यांनी ट्वीट केला आहे.
PM Modi’s sister Basantiben and CM Yogi’s sister Shashi meeting exemplifies the essence of simplicity, Indian culture, and tradition. It's heartening to witness their bond, transcending politics, and making us proud of these two remarkable individuals representing India's values.… pic.twitter.com/CCYLKkvqVb
— Advocate Ajay Nanda (@ajay_mlnanda) August 4, 2023
भारतीय संस्कृतीचे दर्शन
अजय नंदा यांनी दोन्ही बहिणींच्या भेटीचा व्हिडीओ ट्वीट केल आहे. पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्या बहिणींची भेट ही. “भारतीय संस्कृती आणि परंपरचे दर्शन घडते. देशाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या दोन व्यक्तींवर अभिमान आहे.”, असे अजय नंदा यांनी ट्वीटमध्ये म्हटले.
योगींची बहिण चालवते दुकान
योगी आदित्यानाथ यांची बहिण शशी देवी या ‘मां भुवनेश्वरी प्रसाद भंडार’ नावाचे एक दुकान चालविते. या दुकानात पूजेची संपूर्ण साहित्य भेटते. शशी देवी यांचे पती ‘जय श्री गुरु गोरक्षनाथ जी’ नावाचे चहाचे दुकान चालवितात.