घरCORONA UPDATECoronaVirus: सलून व्यावसायिक आणि ग्राहकामुळे अख्ख शहर हादरले!

CoronaVirus: सलून व्यावसायिक आणि ग्राहकामुळे अख्ख शहर हादरले!

Subscribe

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन दाढी करने सलून व्यावसायिकाला महागात पडले आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्या देशात वाढत असताना दुसरीकडे अनलॉक १.० ची सुरुवातही करण्यात आली आहे. यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे विशेष सुरक्षा बाळगून सलून दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र आता सलून व्यावसायिकामुळेच अख्खं शहर धोक्यात आले आहे. रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन दाढी करने सलून व्यावसायिकाला महागात पडले आहे. हे प्रकरण जमशेदपूरमधील आहे. जिल्हा प्रशासनाने त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या या व्यक्तीने होम क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केले, त्याचबरोबर घरी केस कापण्यासाठी सलूनवाल्यालाही बोलवले. गुन्हा दाखल करण्यात आलेली व्यक्ती हृदयवरील उपचार घेऊन घरी पोहोचली होती.

सलून व्यावसायिकाने तब्बल ७० लोकांचेही केस कापले

त्यानंतर रात्री उशीरा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर प्रशासनाला तपासात असेही कळले की, कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी केस कापण्यासाठी आलेल्या सलून व्यावसायिकाने तब्बल ७० लोकांचेही केस कापले होते. सध्या यातील १४ लोकांचा शोध घेऊन सरकारी क्वारंटाइनमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सर्वांची कोरोना तपासणी

दरम्यान, दिल्लीहून त्या व्यक्तीला घरी पोहचवणाऱ्या टेम्पो चालकालाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. सर्वांच्या कोरोना तपासणीसाठी नमुना गोळा केला जात आहेत.

होम क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करा

उपायुक्त रवीशंकर शुक्ला यांनी जिल्ह्यातील जनतेला होम क्वारंटाइनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अगदी थोडासा दुर्लक्ष बऱ्याच लोकांचा जीव धोक्यात टाकू शकतो. तसेच लोकांना सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचा आणि अनिवार्यपणे मास्क आणि सेनिटायझर्सचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -