घरदेश-विदेशघटस्फोटीत पतीला पत्नीने चहा-नाश्ता द्यायची गरज नाही, कोर्टाचा निर्णय

घटस्फोटीत पतीला पत्नीने चहा-नाश्ता द्यायची गरज नाही, कोर्टाचा निर्णय

Subscribe

मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या बेंचने रद्द केलेला आहे. सिंगल बेंच जजने हा आदेश जुलै महिन्यात एका सुनावणीदरम्यान दिला होता. दरम्यान अशा प्रकारचा कोणताही आदेश देणे गरजेचे नाही असं न्यायमूर्ती परेश उपाध्यय आणि न्यायमूर्ती डी भारत चक्रवर्ती यांनी सांगितले.

मद्रास न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पत्नी पासून विभक्त झालेला पती जर का त्याच्या मुलांना भेटायला आला तर त्यावेळी पत्नीने त्याला चहा नाश्ता देणे गरजेचे नाही. विभक्त झालेला पती जेव्हा पत्नीकडे त्याच्या मुलांना भेटण्यासाठी येईल तेव्हा त्याचं स्वागत ‘अतिथी देवो भव’ अशा पद्धतीने करावं, चहा नाष्टा विचारावा असं या आधी सिंगल बेंच न्यायाधीशांनी सुचवलं होतं. पण आता हा आदेश आता मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या बेंचने रद्द केलेला आहे. सिंगल बेंच जजने हा आदेश जुलै महिन्यात एका सुनावणीदरम्यान दिला होता. दरम्यान अशा प्रकारचा कोणताही आदेश देणे गरजेचे नाही असं न्यायमूर्ती परेश उपाध्यय आणि न्यायमूर्ती डी भारत चक्रवर्ती यांनी सांगितले.

हे ही वाचा – ज्ञानवापी प्रकरण : वाराणसी न्यायालयातील सुनावणी पूर्ण, हिंदूंच्या अर्जावर ७ ऑक्टोबरला होणार निर्णय

- Advertisement -

विभक्त झालेल्या एका जोडप्याच्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्यासंबंधीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सिंगल बेंचसमोर सुनावणी सुरू होती. याप्रकरणी त्या मुलाच्या वडिलांना एक दिवसाआड संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्या मुलाची आई त्याला घेऊन कायमस्वरूपी दिल्लीला वास्तव्यास जाण्याच्या तयारीत होती. पण असा कोणताही विचार नसल्याचं त्या मुलाच्या आईने सांगितले. दरम्यान हा मुलगा आईकडे राहत असल्याने त्या मुलाच्या वडिलांना त्याच्या आईच्या घरी जाऊन शुक्रवारी आणि शनिवारी भेटण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयानेही यासाठी मान्यता दिल्ली होती. विभक्त झालेल्या पती किंवा पत्नीसोबत त्यांच्या मुलाच्या भेटीवेळी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने चांगला व्यवहार करावा असा आदेशसुद्धा न्यायालयाने दिला होता.

हे ही वाचा – पंतप्रधान मोदींकडून सूरतेला मोठं गिफ्ट; 3400 कोटींच्या नव्या प्रकल्पांचे केले उद्घाटन

- Advertisement -

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर न्यायालयाने सांगितले की, ज्यावेळी पती – पत्नी एकमेकांशी शत्रू प्रमाणे वागतात. ते एकमेकांशी भांडू शकतात. त्याच भांडणाचा वाईट परिणाम मुलांच्या भावनिक आरोग्यावर होत असतो. भावनांचे हेच ओझे मुले आयुष्यभर घेऊन जगात असतात. मुलांच्या आयुष्यावर याचा नाकारात्मक परिणाम होऊन मुलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होण्याची भीती असते.

त्याचबरोबर प्रत्येक मुलाला त्याच्या आई – वडिलांसोबत सुरक्षित आणि प्रेमपूर्ण वातावरणात राहण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे जर का कोणतेही जोडपे विभक्त झाले. तर त्याच्या परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. पती – पेटीमध्ये असलेले मतभेत त्यांनी त्यांच्यापुरते मर्यादित ठेवावे त्याचा परिणाम मुलांवर होऊ देऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -