घरCORONA UPDATECorona: महिलेच्या एका ट्विटवर सासऱ्यांपर्यंत पोहोचवली शासनाने औषधं

Corona: महिलेच्या एका ट्विटवर सासऱ्यांपर्यंत पोहोचवली शासनाने औषधं

Subscribe

देशात लॉकडाऊन असताना शासन घरोघरी जाऊन लोकांना सेवा पुरवत आहे. उत्तर प्रदेशमधील पीलीभीतसारख्या छोट्याशा गावात औषधं पोहोचवून त्यांनी एका गरजूची मदत केली आहे.

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे राहणाऱ्या एका महिलेने सोमवारी तिच्या पीलीभीत येथे राहणाऱ्या सासऱ्यांना औषधं पोहोचवण्यासाठी ट्विट केले होते. शासनाने या ट्विटची दखल घेत पीलीभीत येथील घरी औषधं पोहोचवली. त्या महिलेने यासाठी शासनाचे आभार मानले आहेत. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती प्रवास करू शकत नाही. अशात नोएडा येथे राहणाऱ्या कनुप्रिया यांनी पीलीभीत येथे राहणाऱ्या सासऱ्यांना हृदयाचा आजार असून त्यांना औषधं घेणे गरजेचे आहे. मात्र त्यांची औषधं संपली आहेत. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे औषधं पोहोचणे गरजेचे असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. याची दखल घेत शासनाने त्वरीत ती औषधं पीलीभीतमध्ये पोहोचवली. अशा कठिणप्रसंगी प्रशासन घरोघरी सेवा पुरवत असल्याचे या घटनेतून पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

कनुप्रिया यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, खासदार वरुण गांधी यांच्यासह पीलीभीत गावाचे प्रमुख सचिव तसेच जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांना ट्विटरवर टॅग करून पीलीभीतमध्ये तातडीने औषधं पोहोचवण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर प्रशासनापासून जिल्हापातळीवर हालचाली सुरू झाल्या. शासनाने लगेच दुसऱ्याच दिवशी कनुप्रिया यांना कंट्रोल रुममधून संपर्क साधला. मात्र महिलेचा नंबर व्यस्त आला. त्यानंतर वैभव श्रीवास्तव यांनी ट्विट करत महिलेला स्वतःचा व्हॉट्सअॅप क्रमांक दिला आणि यावर संपर्क करून औषधांचा तपशील द्या, असे सांगितले. त्यानंतर कनुप्रिया यांनी त्यांना कळवले की ही औषधं लखनौमध्ये उपलब्ध होतील. पीलीभीतमध्ये ही औषधं मिळत नाहीत. श्रीवास्तव यांनी बुधवारीच ही औषधं मिळवून पीलीभीतला पोहोचवण्याची व्यवस्था केली. तसेच ट्विट करून त्या महिलेलाही याची माहिती दिली.

हेही वाचा –

किचनमध्ये शिधा, फ्रीजमध्ये फळं…मग मागितलं फूकटचं रेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -