घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजग दीर्घकालीन लढाईसाठी सज्ज; हिवाळ्यात कोरोनाचं संकट पुन्हा येण्याची शक्यता

जग दीर्घकालीन लढाईसाठी सज्ज; हिवाळ्यात कोरोनाचं संकट पुन्हा येण्याची शक्यता

Subscribe

चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोनाशी दीर्घ युद्धासाठी तयारी सुरू केली आहे.

कोरोना विषाणूमुळे झालेल्या विध्वंसात अनेक देश लॉकडाऊन शिथिल करत आहेत. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणं आहे की हा विषाणू हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पुन्हा लोकांना अडचणीत आणू शकतो. जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशननेही असं म्हटलं आहे की जगाला बरीच वर्ष संघर्ष करावा लागेल. हे लक्षात घेता चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोनाशी दीर्घ युद्धासाठी तयारी सुरू केली आहे. तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की जर आपण पुन्हा घरात किंवा कार्यालयात पार्ट्या सुरू केल्या, फिरायला जाण्यासाठी किंवा बाजारात गर्दी वाढवली तर ते विषाणूला आमंत्रण असेल आणि यावेळी ते अधिक भयानक असेल.

स्पेन सरकारने असा इशारा दिला आहे की आपत्कालीन परिस्थिती आणि लॉकडाऊन वाढवलं ​​नाही तर देशात अराजकता पसरू शकते. आणीबाणीत आणखी मुदतवाढ मंजूर करण्यासाठी सरकार विरोधी पक्षांवर दबाव वाढवत आहे. परंतु संसदेत पुढील आठवड्यात होणाऱ्या मतदानामध्ये आणीबाणीचा कालावधी वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार


तथापि, सरकारचं म्हणणं आहे की आपत्कालीन परिस्थिती वाढवली नाही तर यामुळे मोठं संकट येऊ शकतं. आरोग्यमंत्री सॅलवेडोर इल्ला म्हणाले की आपत्कालीन परिस्थिती अत्यंत महत्वाची होती. कडक लॉकडाऊनमुळे, स्पेनमध्ये मार्चच्या मध्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या सुमारे ३५ टक्क्यावरून ०.१६ टक्क्यांपर्यंत आली आहे.

- Advertisement -

इराणमध्ये पुन्हा मशिदी उघडल्या

सोमवारी देशाच्या काही भागात मशिदी पुन्हा उघडल्या, जेथे कोरोनोचा धोका कमी झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत ७९ हजार ३७९ संक्रमित लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीने सोमवारी १३२ कमी जोखीम असलेल्या शहरांमध्ये मशिदी उघडल्या गेल्या.

जपानमध्ये आपत्कालीन परिस्थिती ३१ मे पर्यंत वाढवली

कोविड -१९ मुळे लागू केलेल्या देशव्यापी आपत्कालीन कालावधी अधिकृतपणे ३१ मे पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय जपान सरकारने सोमवारी जाहीर केला. पंतप्रधान शिंजो आबे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये कोरोनो विषाणूची संख्या १५ हजार ०७८ असून आतापर्यंत ५३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -