घरदेश-विदेशजगभरात राहण्यासाठी सर्वात 'अयोग्य' शहरात पाकिस्तानातील कराचीचा समावेश; तर ढाकाही क्रमवारीत

जगभरात राहण्यासाठी सर्वात ‘अयोग्य’ शहरात पाकिस्तानातील कराचीचा समावेश; तर ढाकाही क्रमवारीत

Subscribe

या सर्वेक्षणासाठी १७२ शहरांचा अभ्यास करण्यात आला आहे त्यानुसार अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीचा सुद्धा समावेश झाला आहे. पाकिस्तान सोबतच बांगलादेशची(bangladesh) राजधानी ढाका(dhaka) मध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.

नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्या सर्वेक्षणात आलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगभरात राहण्यासाठी सर्वात ‘अयोग्य’ शहरांमध्ये पाकिस्तानची(pakistan) आर्थिक राजधानी कराचीचा(karachi) समावेश झाला आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंट्स युनिटने जभरात राहण्यासाठी योग्य आणि अयोग्य अश्या प्रत्येकी १०-१० शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. या साठी एक सर्वेक्षण सुद्धा केले गेले. या सर्वेक्षणासाठी १७२ शहरांचा अभ्यास करण्यात आला आहे त्यानुसार अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीचा सुद्धा समावेश झाला आहे.

हे ही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

- Advertisement -

जगभरातील टॉप 10 यादीत वाईट किंवा अयोग्य ठिकाणांमध्ये पुन्हा एका कराचीचा समावेश झाला आहे. अयोग्यतेच्या यादीत कराची सातव्या स्थानावर आहे. कराची या शहरात अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे असं करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आले आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, मनोरंजन, शिक्षण आणि संसृक्ती यांचा मोठ्या प्रमाणात कराची मध्ये मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. दरम्यान पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परकीय चलनाची सतत घट होत आहे आणि त्यातच वाढत्या महागाई मुळे पाकिस्तान आर्थिक मंदीच्या गर्तेत रुतत चालला आहे.

हे ही वाचा – घरोघरी वाटण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये गंभीर चुका; झेंडे पुरवठादारावर कारवाईची पेडणेकरांची मागणी

- Advertisement -

UNDP च्या मते सद्यस्थितीत पाकिस्तानवर २५० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक कर्ज आहे. कराची हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. हे शहरही सध्या आर्थिक मंदीच्या अस्थिरतेमधून जात आहे. पाकिस्तानवर असलेले हे आर्थिक संकट तिथली जनतेला उपासमारी आणि अस्थिरतेच्या दिशेने घेऊन चालले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करींचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तान सोबतच बांगलादेशची(bangladesh) राजधानी ढाका(dhaka) मध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा – तिरंगा खरेदी करा नाहीतर रेशन मिळणार नाही, वरुण गांधींच्या टि्वटनं खळबळ

पहिली दहा ‘अयोग्य’ शहरे

१- तेहरान, इराण

२- डौआला, कॅमेरून

३- हरारे, झिम्बाब्वे

४- ढाका, बांगलादेश

५- पोर्ट मोरेस्बी, पीएनजी

६- कराची, पाकिस्तान

७- अल्जियर्स, अल्जेरिया

८- त्रिपोली, लिबिया

९- लागोस, नायजेरिया

– दमास्कस, सीरिया

हे ही वाचा – शिंदे गटातील नव्या मंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट; पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद

पहिली दहा ‘योग्य’ शहरे

१- व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

२- कोपनहेगन, डेन्मार्क

३- झुरिच, स्वित्झर्लंड

४- कॅलगरी, कॅनडा

५- व्हँकुव्हर, कॅनडा

६- जिनिव्हा, स्वित्झर्लंड

७- फ्रँकफर्ट, जर्मनी

८- टोरोंटो, कॅनडा

९- आम्सटरडॅम, नेदरलँड

१०- ओसाका, जपान आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -