घरदेश-विदेश'द योगा इन्स्टिट्यूट'चा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान

‘द योगा इन्स्टिट्यूट’चा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान

Subscribe

'द योगा इन्स्टिट्यूट'चा योगासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

२०१८-१९ या वर्षामध्ये योगाचा प्रसार व विकास करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील ‘द योगा इन्स्टिट्यूट’चा पंतप्रधानांच्या पुरस्काराने गौरव केला. विज्ञान भवन येथे झालेल्या विशेष समारंभामध्ये, ‘राष्ट्रीय संस्था’ या श्रेणीमध्ये हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “द योगा इन्स्टिट्यूटने योगा शिक्षण, संशोधन, प्रकाशन, नावीन्य व सर्जनशीलता या बाबतीत प्रमाणके निर्माण केली आहेत. हा पुरस्कार म्हणजे संस्थेच्या संस्थापकाचे कौशल्य, सर्जनशीलता व सामाजिक दृष्टिकोन यांचे प्रतिक आहे.” ‘द योगा इन्स्टिट्यूट’ची स्थापना १९१८ मध्ये, ‘मॉडर्न योगा रिनेसन्स’चे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे योगेंद्र यांनी केली. इन्स्टिट्यूटने २५ डिसेंबर २०१८ रोजी शताब्दी साजरी केली.

- Advertisement -

 संचालकांनी पंतप्रधानांचे आभार मानले

मुंबईतील ‘द योगा इन्स्टिट्यूट’चे संचालक हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. त्या म्हणाल्या की, “आमचा गौरव केल्याबद्दल ‘द योगा इन्स्टिट्यूट’मधील प्रत्येकाच्या वतीने पंतप्रधानांचे व आयुष समिती सदस्यांचे आभार. इन्स्टिट्यूटने गेल्या १०० वर्षांत केलेल्या सर्व परिश्रमांची दखल घेतल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. आम्ही आमची ही परंपरा यापुढेही कायम ठेवू आणि सदैव भारताची व जगाची सेवा करत राहू.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -