…तर मी राजकारण सोडून नितीश कुमारांना आपला नेता म्हणून स्वीकारेन; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत यावरूनच प्रशांत किशोर यांनी एक मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणूका येण्याआधी नितीश कुमार(nitish kumar) अनेकदा भूमिका बदलताना दिसतील असा खोचक टोला प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना लगावला.

prashant kishor

बिहार राज्यातसुद्धा(bihar politics) महाराष्ट्राप्रमाणेच राजकारण ढवळून निघालं नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबर हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तर तेजस्वी यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार यांना टीकेला समोती जावं लागतं आहे. अशातच राजकीय रणनितीकर अशी ओळख असलेले प्रशांत किशोर(prashant kishor) यांनी केलेलं विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत यावरूनच प्रशांत किशोर यांनी एक मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणूका येण्याआधी नितीश कुमार(nitish kumar) अनेकदा भूमिका बदलताना दिसतील असा खोचक टोला प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना लगावला.

त्याचबरोबर येत्या तीन वर्षात दहा लाख नोकऱ्या जर का नितीश कुमार यांनी दिल्या तर मी राजकारण सोडून देईन आणि नितीश कुमार यांना आपला नेता म्हणून स्वीकारेन असं म्हणत प्रशांत किशोर यांनी थेट आव्हानंच दिलं आहे.

हे ही वाचा – ढाकू माकूम…! मनसेकडून दहीहंडीसाठी लाखोंची बक्षिसे, ‘स्पेन’वारीही घडवणार

याच संदर्भात राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर पत्रकार परिषद देत म्हणाले. ‘नितीश कुमार हे फेविकॉल सारखे खुर्चीला चिकटून बसले आहेत. जर का नितीश कुमार यांनी तीन वर्षांत यांनी दहा लाख नोकऱ्या दिल्या तर मी राजकारण सोडून देईन आणि नितीश कुमार यांना आपला नेता म्हणून स्वीकारेन. त्याच बरोबर बिहारच्या जनतेच्या डोळ्यात नितीश कुमार (nitish kumar) धूळफेक करत आहेत. ते आगामी विधानसभा निवडणूक येईपर्यंत नितीश कुमार अनेकदा पलटी मारताना दिसतील’ असंही प्रशांत किशोर म्हणाले.

हे ही वाचा – फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी

तेजस्वी यादव आणि नितीश कुमार

बिहार राज्यातील राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघालं. नितीश कुमार यांनी आरजेडीचाय पाठिंब्याने राज्यत नवीन सरकार स्थापन केले. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्ह्णून तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कालच नितीश कुमार(nitish kumar) मंत्रिमंडळाचा शपथविधी सुद्धा झाला. ज्यामध्ये आरजेडीच्या १६ मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. दरम्यान भाजपसोबत असलेली युती तोडत नितीश कुमार यांनी आरजेडी सोबत हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव(tejaswi yadav) यांचावर मात्र विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत आणि अशातच प्रशांत किशोर यांच्या विधानाने अनेक चर्चा रंगत आहेत.

हे ही वाचा – मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलत नाहीत, आशिष शेलारांकडून कंबोजांची पाठराखण