Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...मग तुमचं काळीज का धडधडतंय? 'भारत' उल्लेखावरून चित्रा वाघ यांचा विरोधकांना टोला

…मग तुमचं काळीज का धडधडतंय? ‘भारत’ उल्लेखावरून चित्रा वाघ यांचा विरोधकांना टोला

Subscribe

मुंबई : राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेत इंडियाचे राष्ट्रपती असे लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ला मोदी सरकार घाबरले असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यावर पलटवार केला आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता मुंबईत या आघाडीची तिसरी बैठक झाली. त्यात आणखी दोन पक्ष सहभागी झाले असून त्यात समन्वय समितीही जाहीर करण्यात आली.

हेही वाचा – G-20 Summit : मोदी सरकारच्या ‘भारत’ला विरोधकांचा आक्षेप, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणतात…

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत’ आणि ‘इंडिया’चा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, ‘आपण सर्वांनी इंडिया हा शब्द वापरणे बंद करून भारत वापरला पाहिजे. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ, राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रात इंडियाचे राष्ट्रपती असं लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. त्यावरून, मोदी सरकारला ‘इंडिया’ची भीती वाटत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्याला झालेल्या कोट्यवधींच्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 800 जणांकडून…

याबाबत चित्रा वाघ यांनी ट्वीट करत, पलटवार केला आहे. जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती ‘भारत’ हीच आहे. हे नावच देशवासीयांची ओळख, अभिमान आणि गर्व आहे. त्याच नावाची पुनर्स्थापना होते आहे, ही बाब सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाची यात्राही ‘भारत’ जोडो नावानेच काढली होती ना? मग तुमचे काळीज का धडधडत आहे? असा सवाल करून, अभिमानाने म्हणा, मेरा भारत महान, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -