घरदेश-विदेशराहुल गांधींवर आहेत आणखी सहा गुन्हे, खटल्यांची सुनावणी कुठपर्यंत?

राहुल गांधींवर आहेत आणखी सहा गुन्हे, खटल्यांची सुनावणी कुठपर्यंत?

Subscribe

नवी दिल्ली – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून खिल्ली उडवल्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने मानहानीच्या खट्ल्याअंतर्गत २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामीनावर असले तरीही लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व रद्द केले आहे. उच्च न्यायालायने त्यांची शिक्षा रद्द केल्यास त्यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळू शकते. परंतु, उच्च न्यायालायनेही त्यांची शिक्षा कायम ठेवल्यास राहुल गांधी पुढचे आठ वर्षे खासदार होऊ शकणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे मानहानीच्या खटल्यामुळे त्यांना ही शिक्षा झाली आहे. परंतु, मानहानीचा हा एकमेव खटला नसून त्यांच्याविरोधात तब्बल सहा खटले सध्या सुरू आहेत.

हेही वाचा – रघुपती राघव राजाराम! राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, आज रणनीती आखणार

  1. ६ मार्च २०१४ रोजी ठाण्यातील एका रॅलीत राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोठा आरोप केला होता. महात्मा गांधींच्या हत्येत आरएसएसचा हात होता असं राहुल गांधी म्हणाले होते. या वक्तव्याप्रकररणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे भिवंडी विभागाचे राष्ट्रीय सचिव राजेश कुंटे यांनी २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी अद्यापही सुरू झालेली नाही.
  2. डिसेंबर २०१५ आरएसएससंबंधित असल्यामुळे एकाला आसाममधील बारपेटा सत्रा येथे जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा एकाने केला होता. याप्रकरणी संघाच्या सदस्याने राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. हे प्रकरण अद्यापही स्थानिक न्यायालयात सुरू असून सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे.
  3. राहुल गांधी यांनी नोटाबंदीविरोधात टोकाची टीका केली होती. केंद्राच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला होता. त्यामुळे अमित शाहा यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. अमित शाह यांच्या ट्वीटला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते की, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित शाह यांचे अभिनंदन. तुमच्या बँकेला 750 चं प्रथम पारितोषिक मिळालं. पाच दिवसांत कोटी! ज्या लाखो भारतीयांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले, नोटाबंदीच्या तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो.” या प्रकरणावर पुढील सुनावणी आता १ जुलै रोजी होणार आहे.
  4. राहुल गांधी यांनी कमांडर इन थीफ अशी टीका भाजपा नेते श्रीश्रीमल यांच्यावर केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये केलेल्या या टीकेविरोधात महेश श्रीश्रीमल यांनी खटला दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू असून काही दिवसांच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. खटल्याविरोधात राहुल गांधी यांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची अद्यापही सुनावणी सुरू झालेली नाही.
  5. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. जर कोणी आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलत असेल तर त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यावर दबाव आणला जातो. त्याला बेदम मारहाण केली जाते. त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना मारलं जातं, असं राहुल गांधी म्हणाले. याविरोधात फेब्रुवारी २०१९ मध्ये आरएसएसचे कार्यकर्ते आणि वकील धृतिमान जोशी यांनी याचिका दाखल केली. या प्रकरणाचीही सुनावणी सुरू झालेली नाही.
  6. अमित शाहांवर हत्येचा आरोपी संबोधल्याने राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला मे २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. कृष्णवदन ब्रह्मभट्ट यांनी राहुल यांची ही टिप्पणी अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं होतं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -