Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ढोंगीपणाचीही सीमा असते... 'भारत' नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा

ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या नावावर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया (INDIA) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यात भर पडली आहे ती, देशाच्या ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावांची. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ढोंगीपणाचीही सीमा असते, असे ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

गुवाहाटी येथे अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे, तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत मोदी सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख करण्यास सुरुवात केली. राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर 2023 या दोन दिवशी जी-20 शिखर परिषद झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या परिषदेसाठी येणार्‍या विदेशी पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण पाठवले होते. या निमंत्रणपत्रिकेत ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ऐवजी ‘रिपब्लिक ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, अन्य कागदपत्रांवरही इंडिया ऐवजी भारत असाच उल्लेक करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य करत, ‘इंडिया’ला घाबरल्यामुळे हा बदल केल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा – फसवणूक आणि लुच्चेगिरीची नऊ वर्षे… ठाकरे गटाची मोदी सरकारवर कडाडून टीका

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत समाजवादी पार्टीचे दिवंगत प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा 2004मधील एक किस्सा सांगितला आहे. 2004मध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्य विधानसभेत देशाला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे संबोधित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव बिनविरोध संमत व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. या निर्णयाला कोणी विरोध केला असेल? भाजपाने तीव्र विरोध केला आणि सभात्याग केला होता, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – राष्ट्रवादीतील शरद पवार गट अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत; आमदार अपात्रतेसाठी केले दोन अर्ज

आता त्यांना ‘इंडिया’ नको आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाने ‘इंडिया’चे नामकरण ‘भारत’ केले आहे. हे केवळ भय आणि दांभिकता आहे. ढोंगीपणाचीही सीमा असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -