घरदेश-विदेश...तर भारत-अमेरिका संबंध घनिष्ठ होऊ शकतात!

…तर भारत-अमेरिका संबंध घनिष्ठ होऊ शकतात!

Subscribe

अमेरिकेच्या जीवनशैलीचे भारतीयांना विशेष आकर्षण असते. परंतु, अमेरिक आणि भारत यांच्यात फारसे मैत्रीचे संबंध नाहीत. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका-भारत संबंध दृढ होण्याची शक्यता आहे.

विकसीत देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. भारतातील उच्चभ्रू आणि सुशिक्षीत लोकांना अमेरिकेच्या जीवनशैलीचे आकर्षण असते. परंतु, अमेरिकेचा ऐतिहासिक शत्रू असलेल्या सोविएत रशियासोबत भारताची घनिष्ठ मैत्री असल्याकारणाने अमेरिका आणि भारताचे संबंध हे फारसे दृढ झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर भारत-अमेरिका संबंध दृढ होऊन दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना मिळेल, अशी आशा वर्तवली जात होती. पंरतु, काही दिवसांपासून ‘२+२’ ची लांबवण्यात आलेली बैठक आणि इराणकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिकेने घातलेले निर्बंध आणि भारताने या निर्बंधला न जुमानल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणास दिलेला नकार या सगळ्या गोष्टींमुळे भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील नातेसंबंध दृढ होण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध फक्त दृढच नाही तर घट्ट मैत्रीचे होण्याची शक्यता आहे. कारण, अमेरिकेच्या २०२० च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आणि तुलसी गॅबार्ड या दोन महिला आहेत.

हेही वाचा – अमेरिकेने भारताचे निमंत्रण नाकारले

- Advertisement -

कोण आहेत कमला हॅरिस?

कमला हॅरिस या सध्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आहेत. भारतीय वंशाच्या त्या पहिल्या अमेरिकी सिनेटर आहेत. २०१० मध्ये त्यांची कॅलिफोर्नियाच्या ३२व्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड झाली होती. हॅरिस यांचा जन्म कॅंलिफोर्नियातील ओकलॅंड येथे झाला होता. त्यांच्या माता चेन्नईच्या तर वडील अमेरिकेच्या जमेकनचे आहेत. त्यांनी अमेरिकेत वकीली केली आहे. २००९ मध्ये त्यांनी ‘स्मार्ट ऑन क्राइम-अ करिअर प्रॉसिक्युटर्स प्लान टू मेक अस सेफर’ हे पुस्तक लिहिले आहे.

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनासाठी ‘ट्रम्प’ना भारताचे निमंत्रण!

- Advertisement -

कोण आहेत तुलसी गॅबार्ड?

तुलसी गॅबार्ड या २०१२च्या निवडणूकांत अमेरिकेच्या हवाई राज्यातून दुसऱ्या कॉंग्रेशनल प्रभागातून निवडून आल्या होत्या. अमेरिकेच्या इतिहासात तुलसी या पहिल्या महिला आहेत ज्यांनी अमेरिकेच्या संसदेत भगवदगीतेवर हात ठेवून आपल्या पदाची शपथ घेतली होती. तुलसी यांचा अध्यात्मावर श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यांची आई हिंदू तर पिता ख्रिश्चन आहेत. परंतु, पितांनी देखील हिंदू धर्म स्विकारला आहे. त्यांचे वडिलही हवाई येथील सिनेटर होते. त्यामुळे वडिलांचा राजकीय वारसा तुलसी चालविणार आहेत. तुलसी यांची भारताला भेट देण्याची तीव्र इच्छा देखील आहे.


हेही वाचा – अबब! अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साडेदहा कोटींची बॉम्ब प्रुफ कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -