Omicron Variant: देशातील लस ओमिक्रॉनवर प्रभावी आहे की नाही? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तर

There is no evidence to suggest that vaccines are not effective against Omicron variant of coronavirus said Health Ministry Joint Secretary Lav Agarwal
Omicron Variant: देशातील लस ओमिक्रॉनवर प्रभावी आहे की नाही? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तरOmicron Variant: देशातील लस ओमिक्रॉनवर प्रभावी आहे की नाही? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तर

देशभरात हळूहळू ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आता देशातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १०१वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा लसीकरण झालेल्या व्यक्तींना होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस ओमिक्रॉनवर प्रभावी आहे की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, ‘कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनविरोधात लस प्रभावी नसल्याचा कोणताही पुरावा नाही.’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात असे १९ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे. तिथे आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे. केरळमध्ये असे ९ जिल्हे आहेत. तर मिझोराममझध्ये ५ जिल्हे, नागालँड, राजस्थान, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये असे प्रत्येकी एक-एक जिल्हे जिथे कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर अधिक आहे.

देशातील सध्या कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४२ लाख ८५ हजार ६१२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५८ हजार ४७० जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३६ लाख ६१ हजार ३३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ५२ हजार ६०६ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोणत्या राज्यात किती आढळले ओमिक्रॉनचे रुग्ण?

महाराष्‍ट्र – ३२

दिल्ली – २२

राजस्थान – १७

कर्नाटक – ८

तेलंगाना – ८

केरल – ५

गुजरात – ५

आंध्र प्रदेश – १

तमिलनाडू – १

चंडीगढ – १

पश्चिम बंगाल – १


हेही वाचा – Omicron Variant: देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या १०० पार; ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव